Maharashtra HSC Result 2022: महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल ‘या’ तारखेला अपेक्षित; जाणून घ्या अधिक तपशील

Maharashtra 12th Result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, बारावीचा निकाल लवकरच प्रसिद्ध करणार आहे.

Maharashtra HSC Result 2022 Date & Time: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच बारावीचा निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. ताज्या अपडेट्सनुसार, महाराष्ट्र एचएससी निकाल २०२२ जाहीर करण्याची तारीख निश्चित करण्यात आली नाहीये. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी की याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) अधिकृत सूचना प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांनी निकालासंबंधित सर्व नवीन माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाइट तपासत रहावे.

हे वाचले का?  पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकालाच्या प्रकाशन तारखेबद्दल अधिकृत अधिसूचना mahresult.nic.in वर प्रसिद्ध करेल. ताज्या माहितीनुसार, महाराष्ट्र एचएससी निकाल १० जून २०२२ रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. या माहितीची पुष्टी करण्यासाठी बोर्डाकडून अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १४ लाख विद्यार्थी एचएससी परीक्षेला बसतात. २०२१ मध्ये कोविड-१९ महामारीमुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.