Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्रासह देशातील राजकीय आणि इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या ब्लॉगमधून घेणार आहोत.
Monsoon Session of Maharashtra Assembly Live Updates, 21July 2023 : महाराष्ट्राच्या विधमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा (२१ जुलै) चौथा दिवस आहे. आज दिवसभरात विधीमंडळात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, रायगडमध्ये झालेली दरड दुर्घटना आणि उपायजोजना, राज्यावरील पावसाचं संकट यासह इतर राजकीय विषयांवर चर्चा होणं अपेक्षित आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडमध्ये होते, त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत. आज मुख्यमंत्री स्वतः विरोधकांचा सामना करताना दिसतील. तसेच देशात मणिपूरमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनेवरून वातावरण तापलं आहे. त्याचे राज्यातही पडसाद उपटताना दिसत आहेत. याविषयीच्या बातम्यांवर आज आपलं लक्ष असेल.
“युरोपियन संसदेत मणिपूरविषयी चर्चा, परंतु भारतात…”, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मणिपूरमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनेवरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. खासदार राऊत नरेंद्र मोदींना उद्देशून म्हणाले, संसद आहे म्हणून तुम्ही पंतप्रधान आहात हे लक्षात ठेवा. मणिपूरचा विषय अत्यंत गंभीर आहे. या विषयावर युरोपियन संसदेत चर्चा होते, लंडनमध्ये चर्चा होते. परंतु, या विषयावर नरेंद्र मोदी आपल्या संसदेत चर्चा करू देत नसतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.