Maharashtra News Live: अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

Marathi News Live Updates: राज्यातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, गुन्हे विश्वातील घडामोडी जाणून घ्या, एका क्लिकवर…

Mumbai Pune Live News Updates, 25 September 2024: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (दि. २३ सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. यानंतर अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन मुलाच्या मृत्यूचा विशेष तपास पथकाककडून तपास करण्याची मागणी केली. या मागणीवर आता उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अक्षय शिंदे प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतानाच मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसल्यामुळे मराठवाड्यात तणाव पाहायला मिळत आहे. उपोषणाच्या नवव्या दिवशी त्यांची तब्येत खालावल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि मविआच्या घटक पक्षांत जागावाटपाची लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.