Maharashtra News Live: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “त्याला पाच कोटी आणि…”

ऑलिम्पिक पदक विजेत्या

Maharashtra Politics Live Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Marathi News Live Updates, 08 October 2024: आज एकीकडे जम्मू-काश्मीर व हरियाणा निवडणुकांचे निकाल लागत असताना दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी वातावरण तापू लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष व शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी त्यांच्या पक्षाचे पहिले उमेदवार जाहीरदेखील केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता लवकरच निवडणुकांची घोषणा होणार असून दुसरीकडे आघाड्यांचं जागावाटपही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

wapnil Kusale Father PC: स्वप्नीलच्या नुसत्या काडतुसांचाच दिवसाचा खर्च… – सुरेश कुसाळे

यापूर्वी १ कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते. पण आम्ही पाच कोटी मिळावेत यासाठी पाठपुरावा करत आहोत. स्वप्नीलचा आगामी काळातला खर्च खूप जास्त आहे. त्यामुळे ५ कोटींशिवाय पर्याय नाही. माझ्या अंदाजे २०२८ पर्यंत त्याला लागणारा खर्च ३ कोटींपर्यंत जाईल. आता त्याला साधी बंदूक घेऊन चालणार नाही. त्याला चांगल्या प्रकारची बंदूक घ्यावी लागेल. दिवसाला त्याला २५०-३०० काडतुसं फायर करावी लागतील. त्या एका काडतुसाची किंमत १०० रुपयांपर्यंत असते. त्यामुळे एका दिवसाचा फक्त काडतुसांचा खर्च ३० हजारापर्यंत जाते – सुरेश कुसाळे

हे वाचले का?  Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: कालीचरण यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका: म्हणाले…

वर्ल्डकप जिंकल्यानंतर पाचव्या दिवशीच विधानभवनात आमच्या सरकारनं महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंना बोलवून ११ कोटींचं जाहीर केलेलं बक्षीस त्यांना दिलं. पण आता ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकून दोन महिने सहा दिवस झाले आहेत. पण शासनानं अजून त्याला विधानभवनात बोलवून एक फूलही दिलेलं नाही. त्यांना ऑलिम्पिक पदकाची काही किंमत आहे की नाही हा मला प्रश्न आहे – सुरेश कुसाळे

हे वाचले का?  कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा; कोकण व गोवामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार

Swapnil Kusale Father PC: स्वप्नीलला ५ कोटी आणि फ्लॅट द्या – सुरेश कुसाळे

स्वप्नीलला पदक मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. पण ती तोकडी आहे अशी आमची भूमिका होती. दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळानं ५ कोटी सुवर्णपदकाला, ३ कोटी रौप्य पदकाला, २ कोटी कांस्य पदकाला जाहीर केलं. पण हे सरकारनं ऑलिम्पिक सामने चालू होण्यापूर्वीच जाहीर करायला हवं होतं. आता मला वाटायला लागलं आहे की स्वप्नील एका सामान्य कुटुंबातला, ज्याला राजकीय पाठिंबा नाही म्हणून तुम्ही त्याला एवढं तोकडं बक्षीस दिलं का? हाच मुलगा एखाद्या मंत्र्याचा किंवा आमदाराचा असता, तर तुम्ही काय केलं असतं? माझी मागणी आहे की राज्य सरकारने किमान त्याला ५ कोटी रुपये बक्षीस द्यावं, बालेवाडीपासून जवळ फ्लॅट मिळावा, तिथल्या रेंजला स्वप्नीलचं नाव द्यावं अशा अनेक मागण्या आहेत. आगामी काळात त्याला सुवर्णपदक जिंकायचं आहे – सुरेश कुसाळे