Maharashtra News Live Update : “…तर एलॉन मस्कला निवडणूक अधिकारी वंदना सुर्यवंशींकडे शिकवणी लावावी लागेल”, राऊतांचा टोला

Marathi News Live Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

Mumbai Maharashtra Live News Updates : लोकसभा निवडणूक संपून आता महाराष्ट्रातील जनतेला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळे राजकीय पक्ष या निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. यासंदर्भातील बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांमध्ये केलेल्या बदलांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. याविषयीच्या बातम्यादेखील आपण वाचणार आहोत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ‘टेस्ला’, ‘स्पेसएक्स’ आणि ‘एक्स’ या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतं असा दावा केल्यामुळे त्याचे भारतात पडसाद उमटू लागले आहेत, यावरही आपलं लक्ष असेल.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

…म्हणून देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले”, आव्हाडांकडून राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला श्रेय

“देवेंद्र फडणवीस हे केवळ दिलीप वळसे पाटलांमुळे मुख्यमंत्री झाले.” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड म्हणाले, “सभागृहात (विधानसभा) दिलीप वळसे पाटील देवेंद्र फडणवीस यांना बोलण्यासाठी एक-एक तास द्यायचे. वळसे पाटील सभागृहात ज्या पद्धतीने कामकाज करायचे ते पाहून समजतं की विधानसभेचा अध्यक्ष कसा असायला हवा. स्पीकर असावेत तर असे.”