Maharashtra News Live : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics Live Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय व इतर बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

Maharashtra Breaking News Live Updates, 16 October 2024 : निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी (१५ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असेल तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. दरम्यान, यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच राज्यभर निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या सर्व बातम्यांचा आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वेध घेणार आहोत.

हे वाचले का?  “बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!