Maharashtra News Live : डॉ.आंबेडकरांच्या छायाचित्राची आव्हाडांकडून विटंबना; जयंत पाटील म्हणाले, “विरोधकांच्या खोट्या प्रचाराला…”

Maharashtra Political News Live Today, 30 May 2024 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा.

Mumbai Live News Update Today : पुणे अपघातप्रकरणी सातत्याने येणाऱ्या नवनव्या बातम्या अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या आहेत. एका मुलाला वाचवण्याकरता अख्खं प्रशासन कसं कामाला लागलं होतं, याचे पुरावे विरोधकांकडून दिले जात आहेत. दरम्यान, दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी काल (२९ मे) महाड येथील चवदार तळे येथे जाऊन मनुस्मृतीचे दहन केले. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोचाही अवमान झाला. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले आहे. राज्यात तापमानाचा पारा वाढत जात असून अनेक ठिकाणी पाण्याची मोठी चिंता निर्माण झाली आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने सरकार पातळीवर निर्णय घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आचारसंहिता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. यासह राज्यातील विविध बातम्या वाचा एका क्लिकवर.