Maharashtra News Live: दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

Maharashtra Today : राज्यातील, देशातील, आंतरराष्ट्रीय तसंच इतर क्षेत्रातील घडामोडी जाणून घ्या

Maharashtra, Mumbai Breaking News Updates : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची हिंमत नाही. तसा कोणी विचारही करू शकत नाही. आम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून नव्हे, तर शिवसेनेच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करून महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी मुंबई तयार करायची आहे,असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला आहे. तर सभेतील गर्दी पाहून शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा उसळून बोलले व त्यांच्या प्रत्येक फटकाऱ्यासरशी विरोधकांचे एक-एक दात घशात गेले, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे. तर अनुकूल स्थितीमुळे मोसमी पावसाचे (नैर्ऋत्य मोसमी वारे) अंदमान समुद्र, निकोबार बेटासंह बंगालच्या उपसागरात सोमवारी आगमन होण्याची शक्यता आहे. केरळ किनारपट्टीवर पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण रविवारी शांततेत पूर्ण झाले असून सोमवारी पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हे कामकाज सुरू आहे.

हे वाचले का?  सातारा : डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाखांचा दंड

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता

उरण शहरालगत असलेल्या ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ल्यावर रविवारी येथील पाण्याच्या हौदाची सफाई सुरू असताना मानवी सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

10:11 (IST) 16 May 2022मोसमी पाऊस आज अंदमानात

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”

अनुकूल स्थितीमुळे मोसमी पावसाचे (नैर्ऋत्य मोसमी वारे) अंदमान समुद्र, निकोबार बेटासंह बंगालच्या उपसागरात सोमवारी आगमन होण्याची शक्यता आहे. केरळ किनारपट्टीवर पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

10:08 (IST) 16 May 2022शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न

शिवडी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली. आरोपीने बनावट स्वाक्षरी करून धनादेशाद्वारे चौधरी यांच्या बँक खात्यातून ७८ लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला होता. या धनादेशाची सत्यता पडताळण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता फसवणूक उघडकीस आली. याप्रकरणी आरोपींच्या आणखी एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.