Maharashtra News Live : महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची जोरदार हजेरी, धरणात आता समाधानकारक जलसाठा

Latest Maharashtra News Today : काही भागांत पावसाने दाणादाण उडवून दिली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Maharashtra- Mumbai Heavy Rain Alert : हवामान विभागाने आज मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.

मुंबईत सकाळपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल साधारण १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर बघता जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण आणि मदत कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात सर्वत्र पावसाने चागंली हजेरी लावली आहे.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका