Maharashtra News Live : राज्यसभेच्या चारही जागा जिंकण्याचा आघाडीला विश्वास; महाराष्ट्रासह देशभरातील क्षणोक्षणीचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यसभेची निवडणूक भाजपने लादली असून राज्यात एक षडयंत्र सुरू आहे. त्या षडयंत्राला बळी पडू नका, असे आवाहन करत बंगालमध्ये तृणमूलने भाजपला गाडले. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीकडे पूर्ण संख्याबळ असून आघाडीच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत एकजूट दाखवून विजय मिळवू आणि नंतर विजयोत्सव साजरा करू, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. तर आपल्याकडे पूर्ण संख्याबळ असल्याने चारही उमेदवारांची विजय निश्चित आहे, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. आमदारांच्या बैठकीत शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडीने विजय निश्चित असल्याचा संदेश दिला.

हे वाचले का?  जालन्यात निबंधक सहकारी विभागात ३० लाख लाच मागणीचे प्रकरण उघडकीस

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाचे वाटप १ जुलै- कृषीदिनापासून सुरू करण्यात येणार असून, कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूकही लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

हे वाचले का?  “जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत”, ‘त्या’ दोन नेत्यांकडे बोट दाखवत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य

डोंबिवलीत शिवसेना नगरसेवकांकडून मनमानी रिक्षा दरवाढ, प्रवासी हैराण

डोंबिवलीत गेल्या आठवड्यात रिपब्लिकन रिक्षा चालक मालक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने मनमानीने रिक्षा प्रवासी भाडे वाढ करून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रस्तावित भाडे दर पत्रकाला आव्हान दिले होते. याविषयीची वातावरण निवळत नाही, तोच बुधवारी सकाळी आयरे प्रभागातील शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी रिक्षा भाड्याचे सुधारीत दर जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.

हे वाचले का?  जिंदाल कंपनीच्या वायुगळतीतील बाधित विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास; १९ विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात हालविले