Maharashtra News Live : रेल्वे स्थानकाची नावं बदलण्यापेक्षा तिथली परिस्थिती बदला; मनसेची टीका

Marathi News Today, 13 March 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!

Mumbai Breaking News Live Update : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांनी घोषित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडमोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून कालपासून त्यांच्या सभांचा झंझावात सुरू झाला आहे. राहुल गांधींच्या यात्रेमुळे काँग्रेस आणि मविआमधील पक्षांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. १७ मार्च रोजी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर मविआची सभा होणार आहे. त्याआधी मनसेकडून राहुल गांधींना इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात येऊन यावेळी स्वा. सावरकर यांच्याबद्दल बोलाल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

हे वाचले का?  Gautam Adani : “गौतम अदाणींनी मविआ सरकार पाडलं, अजित पवारांची कबुली”, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला

रेल्वे स्थानकाची नावं बदलण्यापेक्षा तिथली परिस्थिती बदला; मनसेची टीका

महाराष्ट्र सरकारने मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकाची ब्रिटिशकालीन नावे बदलली आहेत. यावर मनसेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील म्हणाले की, रेल्वे स्थानकाची नावं बदलण्याऐवजी त्या रेल्वे स्थानकाची रुपरेषा बदलली पाहिजे. लोकल प्रवाशांना काय समस्या आहेत, हे खासदारांनी पाहून घेतले पाहिजे.