Maharashtra SSC Result 2022 Live : दहावीचा निकाल ९६.९४ टक्के, SSC बोर्डाची पत्रकार परिषदेत माहिती

विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून ज्या दहावीच्या निकालाची आतुरता लागली होती तो निकाल आज (१७ जून) जाहीर होत आहे.

MSBSHSE 10th Result 2022 Live Updates: विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून ज्या दहावीच्या निकालाची (SSC result) आतुरता लागली होती तो निकाल आज (१७ जून) जाहीर होत आहे. काही वेळातच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) पत्रकार परिषद घेत या निकालाची घोषणा होईल. यात मंडळाकडून विभागनिहाय निकालाची टक्केवारीचे तपशील जाहीर केले जातील.

हे वाचले का?  Maharashtra Weather Update: राज्यात पाऊस पुन्हा परतणार !