Maharashtra Unlock: जिल्ह्यांमधले निर्बंध, त्यांची वर्गवारी, सर्वकाही जाणून घ्या फक्त एका क्लिकवर!

राज्य सरकारने करोना निर्बंधांची माहिती देण्यासाठी एक नवीन वेबसाईट सुरु केली आहे.

राज्यात सध्या करोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ लागली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी लावलेले लॉकडाउनचे निर्बंध आता हळूहळू उठवण्यात येत आहेत. यासाठी राज्य सरकारने जिल्ह्यांच्या करोना परिस्थितीप्रमाणे त्यांची वर्गवारी केली आहे. यानुसार प्रत्येक गटातल्या जिल्ह्यांमध्ये वेगळे निर्बंध आहेत. या सगळ्याची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे.

हे वाचले का?  धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण? ‘धनगड’ प्रमाणपत्रे रद्द; शिंदे समितीचा अहवाल सादर

राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक वेबसाईट नागरिकांसाठी तयार केली आहे. या वेबसाईटवर नागरिकांना करोनासंदर्भात राज्याने केलेल्या उपाययोजना, खबरदारीचे उपाय, राज्य तसंच स्थानिक प्रशासनाने लागू केलेले निर्बंध या सगळ्याविषयीची माहिती या वेबसाईटवर मिळणार आहे.

https://msdmacov19.mahait.org/ या वेबसाईटवर गेल्यावर नागरिकांना ही माहिती मिळणार आहे. या साईटवर राज्यातल्या जिल्ह्यांची वर्गवारी दिलेली आहे. कोणत्या लेव्हलमध्ये कोणता जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने कोणते निर्बंध लावले आहेत, याबद्दलची माहिती या साईटवर उपलब्ध आहे.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!

त्याचबरोबर राज्यातल्या ऑक्सिजन बेड्सची संख्या, आठवड्याभरातली ऑक्सिजनची स्थिती याबद्दलही माहिती मिळते.
दर आठवड्याला ही माहिती अपडेट होत राहते.