Maharashtra Vidhan Sabha Election Result Live Updates : राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सत्तास्थापनेचं घोडं कुठे अडलं?

Maharashtra Assembly Election Result Live Updates : राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? हा एकमेव प्रश्न आता राज्याच्या पटलावर प्रतिक्षेत आहे. यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे.
Maharashtra Politics Live Updates : महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्यानेच बहुधा शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. आधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांची भाषाही मंगळवारी सौम्य झाली. या साऱ्या घडामोडींमधून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीतून चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. तसंच, लवकरच महायुतीची संयुक्त बैठक होण्याची शक्यता आहे. यातच मुख्यमंत्री पदाचा तोडगा निघू शकेल. तोवर राज्याला प्रतीक्षाच करावी लागणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडी जाणून घेऊयात.

हे वाचले का?  Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: कालीचरण यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका: म्हणाले…

राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. जनसामान्यांमध्ये आता एकच प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय. राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असणार, याविषयीची नाका नाक्यावर आणि पारावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री पद ठरत नसल्याने सत्ता स्थापनेचा मुहुर्तही लांबला गेला आहे.