Microsoft Edge आजच अपडेट करा नाहीतर…; सरकारने दिला अलर्ट

CERT-IN ही नागरिकांना कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल बद्दल अलर्ट देत असते.

मायक्रोसॉफ्ट ही एक मोठी टेक कंपनी आहे. सध्या जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक टेक कंपन्या नोकरकपात करत आहेत. यामध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीचा देखील समावेश आहे. या मायक्रोसॉफ्ट कंपनीला इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) ने मायक्रोसॉफ्ट ब्राऊझरबाबत एक अलर्ट जरी केला आहे. CERT-IN ही नागरिकांना कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल किंवा देशातील संभाव्य सायबर हल्ला किंवा सायबर बग बद्दल अलर्ट देत असते. CERT-IN ने Microsoft Edge वेब ब्राउझरमधील एक प्रमुख बग काढून टाकला आहे. मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझरबाबत CERT-IN द्वारे अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे वाचले का?  इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

मायकोरसॉफ्टला देण्यात आलेला इशारा सीईआरटी-इनच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्ट इज मध्ये एक बग असल्याचे या आर्टमध्ये सांगण्यात आले आहे. ज्याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात व सर्व सिस्टीमची सिक्युरिटी तोडून सिस्टीम हॅक करू शकतात. सीईआरटी-इनने असा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. अहवालानुसार, मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझरचे व्हर्जन 109.0.1518.61 या बगने प्रभावित झाले आहे.

हे वाचले का?  मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित

बग पासून सिस्टीम कशी वाचवावी ?

CERT-IN ने आपल्या अहवालात असे म्हंटले आहे की, अशा त्रुटी टाळण्यासाठी तुम्ही तुमचे मायक्रोसॉफ्ट इज त्वरित अपडेट करणे आवश्यक आहे. कंपनीने या ब्राऊझरची नवीन सिरीज लाँच केली आहे. ब्राउझर अपडेट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ब्राउझर ओपन करा आणि उजव्या बाजूला असणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग्जमध्ये जाऊन एजवर क्लिक करा. हे केले की तुम्हाला अपडेटचा पर्याय दिसले. अपडेट केल्यावर ब्राउझर पुन्हा सुरु करण्याचे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.