Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्ट १0 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार? सत्या नडेला यांचा ईमेल; म्हणाले, “हा काळ…”

Satya Nadella on Microsoft Job Cuts : काही लहान पोस्टच्या नोकऱ्यांमध्ये कपात करणार असल्याचे मायक्रोसॉफ्ट कंपनीने गेल्या वर्षी जुलै महिन्यात सांगितले होते.

Microsoft Job Cuts: गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. आता यामध्ये Microsoft कंपनीचा देखील समावेश होऊ आहे. कारण प्रमुख सॉफ्टवेअर कंपनी असणारी मायक्रोसॉफ्ट आपल्या १०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कंपनीने यामागचे कारण हे आर्थिक मंदी असल्याचे सांगितले. कंपनीच्या म्हणण्यानुसार २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये ते १०,००० नोकऱ्या कमी करणार म्हणुजेच १० हजार कमर्चाऱ्यांना कामावरुन कमी केले जाणार आहे. याबद्दल मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल केला आहे.

काही लहान पोस्टच्या नोकऱ्यांमध्ये कपात करणार असल्याचे मायक्रोसॉफ्ट कंपनीने गेल्या वर्षी जुलै महिन्यात सांगितले होते. सीईओ सत्या नडेला यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या फर्मला कोरोना महामारीनंतर आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे विंडोज आणि त्यासोबत असणाऱ्या सॉफ्टवेअरची मागणी कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या अखेरीस कंपनीकडे सुमारे २,२१,००० कर्मचारी होते. त्यातील १,२२,००० हे अमेरिका आणि इतर देशांमधील होते.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार

आर्थिक मंदी व त्यामुळे सुरु असणारी टाळेबंदी यामुळे टेक क्षेत्रात कमर्चाऱ्यांची कपात ही अनेक कंपन्यांकडून सुरु राहणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी महामारीनंतर पुढील दोन वर्षे या क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याचा इशारा दिला होता. या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रत्येक टेक कंपन्यांनी सक्षम होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते.

हे वाचले का?  PM Modi Russia Visit : Video : ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, पुतिन यांची मिश्किल टिप्पणी ऐकून मोदीही हसले

सीईओ सत्या नडेला यांनी केला कर्मचाऱ्यांना ईमेल

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी याबद्दल कर्मचाऱ्यांना ईमेल केला आहे. यात त्यांनी सध्यस्थिती आणि भविष्यातील अंदाज यावर भाष्य केले आहे. हा काळ प्रत्येकासाठी खूप आव्हानात्मक आहे. ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शकपणे करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. काही कर्मचाऱ्यांची कपात नक्कीच केली जात आहे. मात्र कंपनीचे महत्वाचे प्रकल्प जिथे चालू आहेत तिथे नोकरभरती सुरु राहील असे सत्या नडेला यांनी या ईमेलमध्ये म्हटले आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाईल त्या कर्मचाऱ्यांना त्यांचा पूर्ण सन्मान मिळावा व आवश्यक त्या सर्व सुविधा मिळाव्यात याची काळजी घेतली जाणार आहे अशी माहिती नडेला यांनी दिली. अमेरिकेतील मायक्रोसॉफ्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांसाठी आरोग्यसेवा दिली जाणार आहे.

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन

तसेच मायक्रोसॉफ्ट आधीच ChatGPT, Dall-E च्या मागे असलेल्या OpenAI मध्ये आणखी १० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची चर्चा करत आहे. खरे तर Azure OpenAI सेवांचा भाग म्हणून मायक्रोसॉफ्ट त्याच्या Azure ग्राहकांना ChatGPT ऑफर करण्यास सुरुवात करणार आहे असे नडेला यांनी नमूद केले.