MNS Candidates Result: मनसेच्या उमेदवारांना कुठे किती मतं मिळाली? वाचा संपूर्ण १२८ उमेदवारांची यादी; अनेक उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकाची मतं!

128 MNS Candidate Result Updates: विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही आमदार जिंकून आला नसला, तरी अनेक ठिकाणी राज ठाकरेंचे शिलेदार तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Assembly Election MNS Candidates Result Updates: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेला यंदाच्या निवडणुकीत खातंही उघडता आलं नाही. एकीकडे राज ठाकरेंनी निवडणुकीच्या आधीच्या मुलाखतींमध्ये सरकार आमच्याच पाठिंब्यावर येणार, असा ठाम विश्वास व्यक्त केलेला असताना निकाल मात्र मनसेसाठी निराशाजनक राहिले. महाराष्ट्रात १२८ विधानसभा मतदारसंघांमध्ये राज ठाकरेंनी मनसेचे उमेदवार उभे केले होते. पण त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. कल्याणमध्ये राजू पाटील हे मनसेचे विद्यमान आमदारदेखील पराभूत झाले. या पार्श्वभूमीवर आता मनसेच्या मान्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेलं आहे.

हे वाचले का?  Sanjay Raut: “आतापर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्री होते पण आता…” एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर संजय राऊतांचा टोला

मनसेच्या उमेदवारांना मिळालेली मतदारसंघनिहाय मतं..

क्रमांकउमेदवारांची नावंविधानसभा मतदारसंघमिळालेली मतंविजेत्याचं मताधिक्य
राजू पाटीलकल्याण७४७६८ – दुसऱ्या स्थानी६६३९६
अमित ठाकरेमाहीम३३०६२ – तिसऱ्या स्थानी१३१६
भांडुपशिरीष सावंत23335 – तिसऱ्या स्थानी6764
संदीप देशपांडेवरळी43957 – तिसऱ्या स्थानी8801
अविनाश जाधवठाणे शहर42592 – तिसऱ्या स्थानी58253
संगिता चेंदवणकरमुरबाड7894 – तिसऱ्या स्थानी52392
किशोर शिंदेकोथरुड18105 – तिसऱ्या स्थानी112041
साईनाथ बाबरहडपसर32821 – तिसऱ्या स्थानी7122
मयुरेश वांजळेखडकवासला42897 – तिसऱ्या स्थानी52322
१०प्रदीप कदममागाठाणे21297 – तिसऱ्या स्थानी58164
११कुणाल माईणकरबोरीवली17829 – तिसऱ्या स्थानी100257
१२राजेश येरुणकरदहिसर5456 – तिसऱ्या स्थानी44329
१३भास्कर परबदिंडोशी20309 – तिसऱ्या स्थानी6182
१४संदेश देसाईवर्सोवा5037 – चौथ्या स्थानी1600
१५महेश फरकासेकांदिवली पूर्व7876 – तिसऱ्या स्थानी83593
१६वीरेंद्र जाधवगोरेगांव9718 – तिसऱ्या स्थानी23600
१७दिनेश साळवीचारकोप15200 – तिसऱ्या स्थानी91154
१८भालचंद्र अंबुरेजोगेश्वरी पूर्व12805 – तिसऱ्या स्थानी1541
१९विश्वजीत ढोलमविक्रोळी16813 – तिसऱ्या स्थानी15526
२०गणेश चुक्कलघाटकोपर पश्चिम25862 – तिसऱ्या स्थानी12971
२१संदीप कुलथेघाटकोपर पूर्व5615 – तिसऱ्या स्थानी34999
२२माऊली थोरवेचेंबूर7820 – चौथ्या स्थानी१०७११
२३जगदीश खांडेकरमानखुर्द-शिवाजीनगर5414 – सहाव्या स्थानी१२७५३
२४निलेश बाणखेलेऐरोली6908 – पाचव्या स्थानी९१८८०
२५गजानन काळेबेलापूर17704 – चौथ्या स्थानी३७७
२६सुशांत सूर्यरावमुंब्रा-कळवा13914 – तिसऱ्या स्थानी96228
२७विनोद मोरेनालासोपारा16949 – तिसऱ्या स्थानी36875
२८मनोज गुळवीभिवंडी-पश्चिम23335 – तिसऱ्या स्थानी6764
२९संदीप राणेमिरा भाईंदर5343 – चौथ्या स्थानी६०४३३
३०हरिश्चंद्र खांडवीशहापूर5648 – चौथ्या स्थानी१६७२
३१महेंद्र भानुशालीचांदिवली7347 – तिसऱ्या स्थानी20625
३२प्रमोद गांधीगुहागर6712 – तिसऱ्या स्थानी2830
३३रविंद्र कोठारीकर्जत-जामखेड
३४कैलास दरेकरआष्टी730 – आठव्या स्थानी७७९७५
३५मयुरी म्हस्केगेवराई3215 – सहाव्या स्थानी४२३९०
३६शिवकुमार नगराळेऔसा1541 – चौथ्या स्थानी३३४६३
३७अनुज पाटीलजळगाव1470 – सातव्या स्थानी८७५०३
३८प्रवीण सूरवरोरा2071 – आठव्या स्थानी१५४५०
३९रोहन निर्मळकागल1918 – चौथ्या स्थानी११५८१
४०वैभव कुलकर्णीतासगांव-कवठे महाकाळ782 – आठव्या स्थानी27644
४१महादेव कोनगुरेसोलापूर दक्षिण2155 – सहाव्या स्थानी७७१२७
४२संजय शेळकेश्रीगोंदा1084 – सहाव्या स्थानी३७१५६
४३विजयराम किनकरहिंगणा1122 – सातव्या स्थानी७८९३१
४४आदित्य दुरुगकरनागपूर दक्षिण895 – सहाव्या स्थानी15658
४५परशुराम इंगळेसोलापूर शहर, उत्तर1155 – सातव्या स्थानी54583
४६मंगेश पाटीलअमरावती2545 – सहाव्या स्थानी5413
४७दिनकर पाटीलनाशिक, पश्चिम46649 – तिसऱ्या स्थानी६८१७७
४८नरसिंग भिकाणेअहमदपूर-चाकूर1132 – सातव्या स्थानी31659
४९अभिजित देशमुखपरळी
५०सचिन रामू शिंगडाविक्रमगड4619 – सहाव्या स्थानी41408
५१वनिता कथुरेभिवंडी ग्रामीण13816 – चौथ्या स्थानी५७९६२
५२नरेश कोरडेपालघर10251 – तिसऱ्या स्थानी४०३३७
५३आत्माराम प्रधानशहादा
५४स्नेहल जाधववडाळा6972 – तिसऱ्या स्थानी24973
५५प्रदीप वाघमारेकुर्ला3197 – चौथ्या स्थानी४१८७
५६संदीप पाचंगेओवळा-माजिवाडा13552 – तिसऱ्या स्थानी108151
५७सुरेश चौधरीगोंदिया513 – सहाव्या स्थानी६१६०८
५८अश्विन जैस्वालपुसद1614 – सहाव्या स्थानी९०७६९
५९गणेश भोकरेकसबा पेठ4894 – तिसऱ्या स्थानी19423
६०गणेश बरबडेचिखली1323 – तिसऱ्या स्थानी3201
६१अभिजित राऊतकोल्हापूर, उत्तर2036 – तिसऱ्या स्थानी29563
६२रमेश गालफाडेकेज1537 – पाचव्या स्थानी२६८७
६३संदीप उर्फ बाळकृष्ण हटगीकलीना6062 – तिसऱ्या स्थानी5008
६४योगेश जनार्दन चिलेपनवेल10231 – चौथ्या स्थानी५१०९१
६५शिवशंकर लगरखामगांव
६६मल्लिनाथ पाटीलअक्कलकोट1293 – पाचव्या स्थानी४९५७२
६७नागेश पासकंटीसोलापूर शहर मध्य
६८अमित देशमुखजळगाव जामोद
६९भैय्यासाहेब पाटीलमेहकर1202 – पाचव्या स्थानी4819
७०रुपेश देशमुखगंगाखेड2479 – चौथ्या स्थानी26292
७१शेखर दुंडेउमरेड421 – सातव्या स्थानी१२८२५
७२बाळासाहेव पाथ्रीकरफुलंब्री843 – दहाव्या स्थानी३२५०१
७३राजेंद्र गपाटपरांडा843 – दहाव्या स्थानी1509
७४देवदत्त मोरेउस्मानाबाद (धाराशिव)2042 – चौथ्या स्थानी३६५६६
७५सागर दुधानेकाटोल1232 – सहाव्या स्थानी३८८१६
७६सोमेश्वर कदमबीड770 – बाराव्या स्थानी५३२४
७७फैझल पोपेरेश्रीवर्धन2125 – तिसऱ्या स्थानी८२७९८
७८युवराज येडुरेराधानगरी614 – पाचव्या स्थानी३८२५९
७९वासुदेव गांगुर्डेनंदुरबार1209 – तिसऱ्या स्थानी७६२४७
८०अनिल गंगतिरेमुक्ताईनगर972 – सहाव्या स्थानी२३९०४
८१घनश्याम निखोडेसावनेर219 – अकराव्या स्थानी२६४०१
८२अजय मारोडेनागपूर पूर्व2261 – आठव्या स्थानी११५२८८
८३गणेश मुदलियारकामठी
८४भावेश कुंभारेअर्जुनी मोरगाव555 – बाराव्या स्थानी१६४१५
८४संदीप कोरेतअहेरी1993 – आठव्या स्थानी१६८१४
८६अशोक मेश्रामराळेगाव2023 – पाचव्या स्थानी2812
८७साईप्रसाद जटालवारभोकर846 – सहाव्या स्थानी५०५५१
८८सदाशिव आरसुळेनांदेड उत्तर522 – सातव्या स्थानी३५०२
८९श्रीनिवास लाहोटीपरभणी986 – सहाव्या स्थानी३४२१६
९०उल्हास भोईरकल्याण पश्चिम2214 – तिसऱ्या स्थानी४२४५४
९१भगवान भालेरावउल्हासनगर4969 – चौथ्या स्थानी३०७५४
९२सुनील इंदोरेआंबेगाव1483 – चौथ्या स्थानी१५२३
९३योगेश सूर्यवंशीसंगमनेर1285 – चौथ्या स्थानी१०५६०
९४ज्ञानेश्वर गाडे (माऊली)राहुरी779 – पाचव्या स्थानी३४४८७
९५सचिन डफळनगर शहर1145 – तिसऱ्या स्थानी३९६१८
९६श्रीराम बादाडेमाजलगाव995 – दहाव्या स्थानी5899
९७संतोष अबगुलदापोली4960 – तिसऱ्या स्थानी२४०९३
९८रवी गोंदकरइचलकरंजी2143 – चौथ्या स्थानी५६८११
९९अश्विनी लांडगेभंडारा925 – आठव्या स्थानी३८३६७
१००रामकृष्ण मडावीअरमोरी
१०१लखन चव्हाणकन्नड3595 – सहाव्या स्थानी१८२०१
१०२प्रशंसा अंबेरेअकोला पश्चिम
१०३रामकृष्ण पाटीलसिंदखेडा1054 – पाचव्या स्थानी९५८८४
१०४कॅप्टन सुनील डोबाळेअकोट792 – सातव्या स्थानी१८८५१
१०५जुईली शेंडेविलेपार्ले12123 – तिसऱ्या स्थानी५४९३५
१०६प्रसाद सानपनाशिक पूर्व4987 – चौथ्या स्थानी८७८१४
१०७मोहिनी जाधावदेवळाली3931 – पाचव्या स्थानी४०६७९
१०८अंकुश पवारनाशिक मध्य
१०९मुकुंदा रोटेजळगाव ग्रामीण1619 – तिसऱ्या स्थानी५९२३२
११०विजय वाघमारेआर्वी
१११मंगेश गाडगेबाळापूर677 – सातव्या स्थानी११७३९
११२भिकाजी अवचरमूर्तिजापूर811 – सहाव्या स्थानी३५८६४
११३गजानन वैरागडेवाशिम1517 – चौथ्या स्थानी१९८७४
११४सतीश चौधरीहिंगणघाट627 – नवव्या स्थानी३००९४
११५राजेंद्र नजरधनेउमरखेड7061 – तिसऱ्या स्थानी१६६२९
११६सुहास दाशरथेऔरंगाबाद मध्य1145 – सहाव्या स्थानी८११९
११७अकबर सोनावालानांदगाव479 – बाराव्या स्थानी८९८७४
११८काशिनाथ मेंगाळइगतपुरी20374 – चौथ्या स्थानी८६५८१
११९विजय वाढियाडहाणू2388 – चौथ्या स्थानी५१३३
१२०शैलेश भुतकडेबोईसर7049 – चौथ्या स्थानी४४४५५
१२१मनोज गुळवीभिवंडी पूर्व1003 – तिसऱ्या स्थानी५२०१५
१२२जगन्नाथ पाटीलकर्जत खालापूर
१२३सत्यवान भगतउरण2461 – चौथ्या स्थानी६५१२
१२४अमोल देवकातेइंदापूर499 – नवव्या स्थानी१९४१०
१२५उमेश जगतापपुरंदार2920 – चौथ्या स्थानी२४१८८
१२६राजू कापसेश्रीरामपूर1324 – सातव्या स्थानी१३३७३
१२७अविनाश पवारपारनेर1003 – सातव्या स्थानी१५२६
१२८राजेश जाधवखानापूर1012 – पाचव्या स्थानी७८१८१

मनसे उमेदवारांच्या निकालाची सविस्तर यादी

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : ॲप आणि संकेतस्थळ बंद, लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर त्यासंदर्भात फक्त तीन शब्दांची पोस्ट एक्सवर शेअर केली. यामध्ये ‘अविश्वसनीय! तूर्तास एवढेच…’,असं लिहिलं होतं. दरम्यान, माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार यांनी जाहीर भूमिका घेतल्यानंतरही युतीसाठी म्हणून माघार घेतली आणि मनसेला एकटं पाडलं, अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.

हे वाचले का?  Ajit Pawar : महाराष्ट्राचा कारभारी कधी ठरणार? अजित पवारांनी चष्मा काढत थेट तारीखच सांगितली; म्हणाले, “शपथविधी..”