Mohammad Amaan : कर्णधार मोहम्मद अमानच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताने उभारला धावांचा डोंगर, जपानसमोर ठेवले ३४० धावांचे लक्ष्य

Mohammad Amaan century : भारतीय अंडर-१९ संघाचा कर्णधार मोहम्मद अमानने एसीसी अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत जपानविरुद्ध १२२ धावांची शानदार खेळी केली, ज्यामुळे संघाला ६ बाद ३३९ धावा करता आल्या.
Mohammad Amaan century against Japan : भारतीय अंडर-१९ संघाचा कर्णधार मोहम्मद अमानने जपानविरुद्ध शानदार कामगिरी केली. एसीसी अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत त्याने अप्रतिम शतक झळकावले. अमानने १०६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. ८१ धावांवर दोन विकेट्स पडल्यानंतर मोहम्मद अमान फलंदाजीला आला. त्याने संघाची आणखी पडझड न होऊ देता योग्य प्रकारे डाव सावरला. अमानने सुरुवातीला कोणतीही घाई न करता सावधपणे खेळण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर त्याने आपले खरे रुप दाखवत दमदार फटकेबाजी केली.

मोहम्मद अमान १२२ धावा करून नाबाद राहिला –

१८ वर्षीय मोहम्मद अमान शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने १०३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने ११८ चेंडूत नाबाद १२२ धावा केल्या. अमानने आपल्या खेळीत ७ चौकार मारले. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तत्पूर्वी जपान अंडर-१९ क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पूर्ण ५० षटके खेळून ६ गड्यांच्या मोबदल्यात ३३९ धावा केल्या. ही अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेतील कोणत्याही संघाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.

हे वाचले का?  रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या L&T च्या अध्याक्षांना कर्मचाऱ्यांपेक्षा ५०० पट अधिक वेतन, २०२३-२४ साठी मिळाले ५१ कोटी रुपये

आयुष म्हात्रेनेही झळकावले झंझावाती अर्धशतक –

भारताचा सलामीवीर आयुष म्हात्रेने या सामन्यात आपले अर्धशतक (५४ धावा) २७ चेंडूत पूर्ण केले. आयुषनेही आपल्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार मारले. केपी कार्तिकेयनेही मधल्या फळीत येऊन चांगली फटकेबाजी केली. त्याने ४९ चेंडूत ५७ धावांचे योगदान दिले. मात्र, वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. त्याला चांगली सुरुवात केली होती, पण मोठ्या खेळीत त्याचे रुपांतर करु शकला. तो २३ धावा करुन तो बाद झाला. अशा प्रकारे भारताने ६ गडी गमावून जपानला ३४० धावांचे मोठे लक्ष्य दिले.

हे वाचले का?  नव्या प्राप्तिकर कायद्यात सुलभपणा आणण्याचा प्रयत्न, अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक येण्याची शक्यता

u

भारताच्या डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. आयपीएल २०२५ मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना विकत घेतलेला वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा आपली छाप सोडू शकला नाही. १३ वर्षीय सूर्यवंशी अवघ्या २३ धावा करून बाद झाला. वैभवने पाकिस्तानविरुद्ध केवळ १ धाव केली होती. मात्र, त्याचा जोडीदार आयुष म्हात्रेने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. आरआरने वैभवला विकत घेतल्यापासून सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत. मात्र, आयपीएलमध्ये विकल्या गेल्यानंतर सूर्यवंशी काही मोठी कामगिरी करू शकलेला नाही.

हे वाचले का?  इस्रोकडून अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी; अमेरिका, रशिया, चीननंतर भारताचा यशस्वी प्रयोग