Monsoon Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार, तीव्रता वाढत असल्याने मान्सूनचा जोर वाढला

राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून येत्या २८ जुलैपर्यंत ही स्थिती कायम राहील,असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

लोकसत्ता टीम

नागपूर: राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून येत्या २८ जुलैपर्यंत ही स्थिती कायम राहील,असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.बंगालच्या उपसागरात सोमवारी संध्याकाळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याची तीव्रता वाढत आहे

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?

वायव्य दिशेने सरकणाऱ्या या प्रणालीसोबतच अरबी समुद्रात दक्षिण कोकण ते उत्तर केरळपर्यंत किनारपट्टी भागात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे क्षेत्रही महाराष्ट्राजवळ प्रभावशाली आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात बुधवारसाठी आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी पालघर, ठाण्यासह मुंबईतही ऑरेंज अलर्ट कायम आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका