Nashik Ganpati Visarjan 2023 Live : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष, पालकमंत्री दादा भुसेही ढोल वादनात मग्न

शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती विसर्जन रथ मिरवणुकीला पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली.

नाशिक : शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती विसर्जन रथ मिरवणुकीला पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील विविध मंडळांनी सहभाग घेतला आहे. मिरवणूक हळूहळू पुढे सरकत आहे.

हे वाचले का?  देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू

मिरवणुकीला प्रारंभ झाला, त्यावेळी आमदार प्रा.देवयानी फरांदे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आवेश पलोड, यांच्यास‍ह मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक लवकरात लवकर पुढे नेऊन निर्विघ्नपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी भुसे यांनी मंडळांना केले.

सुरुवातीला महापालिकेच्या शासकीय मानाच्या गणपतीची पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर थेट मिरवणूकीत सहभागी होवून पालकमंत्री भुसे यांनी स्वत: ढोल वाजवून मिरवणूकीस प्रारंभ केला. मिरवणुकीत शिवसेना मंडळाने केरळमधील लोककला पथक आणले असून या पथकाचे नृत्य मिरवणुकीतील आकर्षण ठरले आहे

हे वाचले का?  अर्ध्या तासाच्या पावसात नाशिकमधील रस्ते पाण्याखाली; गटारीचे पाणी गोदापात्रात