NEET Paper Leak : आरोपींकडे सापडलेल्या जळालेल्या प्रश्नपत्रिकेतून अनेक खुलासे, तब्बल ६८ जुळणारे प्रश्न अन्…

सध्या बिहार EOU पेपर फुटण्याची वेळ आणि ठिकाण ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. प्रश्नपत्रिका ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रिया एनटीएने ईओयूला सांगितली आहे.

नीट परीक्षेतील पेपर फुटले होते, असं बिहार सरकारच्या चौकशीतून सिद्ध झालं आहे. त्यांनी याबाबत केंद्र सरकारला कळवलं आहे. कारण,कथित जळालेल्या छायाप्रतींमध्ये जवळपास ६८ प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळले आहेत, असं आर्थिक गुन्हे शाखेने (EOU) म्हटलंय. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) पाच दिवसांपूर्वी या प्रश्नपत्रिका EOU ला पाठवल्या होत्या. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

शनिवारी शिक्षण मंत्रालयाला प्राप्त झालेल्या EOU च्या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घरातून जे जळालेले पेपर सापडले होते, त्यावर काही शाळांचे युनिक परीक्षा केंद्रांचे नंबरही होते. EOU ने मूळ कागद आणि त्यातील प्रश्नांशी जळलेल्या प्रश्नपत्रिकेशी जुळवाजुळव करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेतली. EOU अहवालाच्या आधारे शिक्षण मंत्रालयाने शनिवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. EOU ने रविवारी आणखी पाच संशयितांना अटक केली आणि पेपर लीक प्रकरणाशी संबंधित पकडलेल्यांची एकूण संख्या १८ वर पोहोचली.

हे वाचले का?  Kolkata Rape Case : पीडितेच्या शरीरावर १४ जखमा, फुफ्फुसात रक्तस्राव तर गुप्तांगात आढळला चिकट द्रव्य; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर!

६८ प्रश्नांचे अनुक्रमांकही सारखेच

महत्त्वाचं म्हणजे, मूळ प्रश्नपत्रिका आणि जळालेल्या प्रश्नपत्रिकेत ६८ प्रश्न सारखेच असून या प्रश्नांचे अनुक्रमांकही एकसारखेच आहेत. जळालेले हे पेपर परीक्षेच्याच दिवशी म्हणजेच ५ मे रोजीच सापडले होते. परंतु, EOU ने हे पेपर तपासून पाहण्यास उशीर केला. तसंच, एनटीएच्या अनिच्छेमुळे ही प्रश्नपत्रिका राज्य सरकारकडे पाठवण्यासही विलंब झाला.

एक लिफाफा चुकीच्या पद्धतीने फाडला

सध्या बिहार EOU पेपर फुटण्याची वेळ आणि ठिकाण ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. प्रश्नपत्रिका ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रिया एनटीएने ईओयूला सांगितली आहे. ज्यामुळे पेपर कसा आणि कुठून फुटला याबाबतची माहिती मिळू शकेल. सूत्रांनी सांगितले की, पथकाने शाळेला भेट देऊन प्रश्नपत्रिका आलेले सर्व लिफाफे आणि खोके तपासले असता, एक लिफाफा वेगळ्या टोकाला उघडल्याचे निदर्शनास आले. प्रश्नपत्रिका आणारे सर्व लिफाफे नेहमी विशिष्ट पद्धतीने फाडले जातात. यासाठी शिक्षकांना विशेष ट्रेनिंगही दिली जाते. परंतु एक लिफाफा, चुकीच्या पद्धतीने फाडण्यात आला होता.

हे वाचले का?  जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

ओएसिस शाळेचे मुख्याध्यापक एहसानहुल हक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पॅकेट शाळेत पोहोचण्यापूर्वीच पेपर लीक झाला असावा. ओएसिस शाळेसह हजारीबागमधील चार केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यासाठी जिल्हा समन्वयक हक यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे की शाळेच्या केंद्र अधीक्षक आणि एनटीएने नियुक्त केलेल्या निरीक्षकांना सकाळी हे पॅकेट मिळाले.

हक म्हणाले, “पॅकेट शाळेत पोहोचताच निरिक्षकांसह अनेक लोक सामील झाले. त्यानंतर पेपर असलेले पॅकेट विद्यार्थ्यांसमोर उघडण्यात आले. ओएसिस हे परीक्षा केंद्र म्हणून जळलेल्या कात्रण्यांबद्दल विचारले असता, हक म्हणाले, “प्रश्नपत्रिका सात-स्तरीय पॅकेटमध्ये सीलबंद असली तरीही, EOU अधिकारी म्हणाले की हे पॅकेट अतिशय अत्याधुनिक पद्धतीने उघडलेले दिसते. शाळेच्या बाजूने काही गैरप्रकार आढळल्यास शाळेच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असते.”

हे वाचले का?  Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक

EOU ने अटक केलेल्या लोकांची डिजिटल उपकरणे आणि फोन फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. कारण, आरोपींनी त्यांची उपकरणे फॉरमॅट केली होती. सर्व आरोपींनी पोलिसांसमोर साक्ष दिली आहे की अटक केलेल्यांपैकी चार परीक्षार्थींनी ५ मे रोजी NEET-UG परीक्षेच्या एक दिवस आधी लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे राजबंशी नगर येथील एका ठिकाणी राहून पाठांतर केली.