NEET UG परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर; ‘असा’ पाहता येणार निकाल!

आज नीट यूजीचा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता नीट युजीचा हा अंतिम निकाल असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली. नीट परीक्षेच्या पेपरफुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने फेरपरीक्षा घेण्याची मागणी फेटाळून लावत नीट-यूजी फेरपरीक्षा होणार नाही, असा मोठा निर्णय दिला. त्यानंतर आता नॅशनल टेस्टींग एजन्सीने परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल जाहीर केला आहे.

दरम्यान, आता नीटची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना exams.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने फेरपरीक्षा घेण्याची मागणी फेटाळल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट यूजीचा सुधारित निकाल पुढील दोन दिवसांमध्ये जाहीर केला जाईल, असं सांगितलं होतं. त्यानुसार आज नीट यूजीचा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता नीट युजीचा हा अंतिम निकाल असणार आहे.

हे वाचले का?  PM Modi calls Biden: पंतप्रधान मोदींचा बायडेन यांना फोन; युक्रेन दौरा आणि बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षिततेवर चर्चा

दरम्यान, विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेल्या भौतिकशास्त्राच्या प्रश्नांची आयआयटी दिल्लीकडून तपासणी करून घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला दिले होते. तसेच भौतिकशास्त्राच्या प्रश्नासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या गटाला दिलेले भरपाईचे गुण परत घेण्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता नॅशनल टेस्टींग एजन्सीने नीट यूजीचा सुधारित अंतिम निकाल जाहीर केला आहे. नीट यूजीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आपला निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहता येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला होता?

नीट यूजीची परीक्षेचे पेपर फुटल्याने देशभर गोंधळ उडाला होता. यानंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं होतं. तसेच या प्रकरणात अनेकांना अटक झाली होती. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या याचिकेवर सुनावणी घेत असताना फेरपरीक्षा घेण्याची मागणी फेटाळून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, पेपरफुटी प्रकरणात हे पूर्वनियोजित असल्याचा एकही पुरावा मिळाला नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे नीट-यूजी फेरपरीक्षा होणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

हे वाचले का?  Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, विशेष न्यायालयाचे आदेश; कारण काय?

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी निकाल देताना सांगितले होते की, “सध्या आपल्याकडे असलेल्या पुराव्याच्या आधारे पेपरफुटी प्रकरण हे सुनियोजित पद्धतीने राबवविले गेले, हे सिद्ध होत नाही. त्यामुळे परीक्षेचे पावित्र्य भंग झाले, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही”, असेही सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी निर्णय देताना म्हटलं होतं.

सुधारित निकाल कसा पाहायचा?

NEET exam.nta.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

मुख्यपृष्ठावरील NEET UG सुधारित निकाल या लिंकवर क्लिक करा.

हे वाचले का?  महामतदान २० नोव्हेंबरला! राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २३ नोव्हेंबर रोजी निकाल

तेथे तुम्हाला एक नवीन पृष्ठ दिसेल.

नवीन पृष्ठावर असलेल्या ‘NEET २०२४ सुधारित स्कोअर कार्ड’ या लिंकवर जा.

तेथे अर्ज क्रमांक जन्मतारीख आणि ईमेल आयडीसह इतर तपशील भरा आणि सबमिट करा.

यानंतर सुधारित NEET UG स्कोअरकार्ड 2024 स्क्रीनवर होईल. यानंतर उमेदवाराचा निकाल डाउनलोड करता येईल.