OlA EV Hub: ओला भारतात उभारणार जगातील सर्वात मोठे EV HUB: करणार ७,६१४ कोटींची गुतंवणूक, मिळणार ‘इतके’ रोजगार

OlA EV Hub in India : गेल्या वर्षी Ola ने लिथियम आयन सेल NMC-2170 चे लॉन्चिंग केले होते.

World Largest Electric Vehicle Hub in India: इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola इलेक्ट्रिक भारतातील तामिळनाडू राज्यामध्ये एक ईव्ही हब स्थापन करणार आहे. ज्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे सेल, ईव्ही तयार करण्याच्या सुविधा आणि डीलर – सप्लायर असतील. ओला इलेक्ट्रिक कंपनीने शनिवारी याबद्दल माहिती दिली आहे. ईव्ही हब हे एकाच ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी सर्वात मोठे सपोर्टींग इकोसिस्टीम बनेल असे कंपनीचे म्हणणे आहे.

Ola चे सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले की, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील २५ वर्षे भारतात अमृत काळाच्या रूपात पाहिली आहेत. मला ठाम विश्वास आहे की हे दशक आमचे आहे आणि आम्हाला आमचे भविष्य घडवण्याची मोठी संधी आहे. ईव्हीसाठी जागतिक केंद्र बनण्याच्या दृष्टीने आम्ही योग्य मार्गावर आहोत. ओलचे ईव्ही हब संपूर्ण ईव्ही इकोसिस्टीमला एका छताखाली आणेल. ज्यामध्ये आम्ही टू-व्हिलर , फोर-व्हिलर आणि सेलमध्ये एक मजबूत वर्टिकल इंटिग्रेटेड मोबिलिटी कंपनी होईल असे त्यांनी कंपनीच्या निवेदनामध्ये म्हटले आहे. ओला त्याच्या आगामी ईव्ही हबमधून मोठ्या प्रमाणात सेलचे उत्पादन सुरु करेल.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

गेल्या वर्षी Ola ने लिथियम आयन सेल NMC-2170 चे लॉन्चिंग केले होते. हे त्यांच्या बंगळुरू येथील अत्याधुनिक बॅटरी इनोव्हेशन सेंटरमध्ये तयार करण्यात आले होते. यामध्ये ५०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाली होती.

Ola इलेक्ट्रिकने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या उपस्थितीमध्ये सरकारसोबत सामंजस्य करार केला. ओला राज्यामध्ये ७,६१४ कोटी रुपयांची गुतंवणूक करणार आहे. या प्लांटमध्ये इलेक्ट्रिक कार आणि लिथियम आयन सेल तयार करणार आहे. ओलाच्या या गुंतवणुकीमुळे राज्यात ३,१११ नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

हे वाचले का?  Wayanad Landslides Update : केरळच्या भूस्खलन दुर्घटनेतील मृतांची संख्या २५६ वर; १९० नागरिक अद्यापही बेपत्ता!

हा प्रकल्पामध्ये तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील SIPCOT बारगुर मध्ये 20GW बॅटरी उत्पादन क्षमतेचा एक इलेक्ट्रिक फोर व्हिलर आणि EV सेल प्लांटचा समावेश आहे. प्रस्तावित चारचाकी वाहन प्रकल्प २०० एकरावर सुरु करण्यात येणार आहे. सेल प्लांट हा १०० एकर तर , सध्या असलेला टू-व्हिलर प्लांट हा ५०० एकरवर आहे. ओलाने २०२४ पर्यंत एकदा चार्ज केले की सुमारे ५०० किमीच्या रेंजसह आपली फोर-व्हिलर ईव्ही सुरु करण्याची योजना तयार केली आहे.

हे वाचले का?  Crime News : ट्यूशनवरुन घरी पतरणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत सापडली मुलगी, कुठे घडली घटना?

TAP TO UNMUTE

Advertisement