बीए. १ आणि बीए. १.१. हे सर्वात आधी आढळून आलेले ओमायक्रॉन सब-व्हेरिएंट होतं.
जगभरामध्ये वेगाने प्रादुर्भाव होत असणारा आणि तितक्याच वेगाने स्वत:मध्ये सातत्याने बदल घडवणारा ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट जगातील ५७ देशांमध्ये पसरल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. यामधील धक्कादायक बाब म्हणजे ओमायक्रॉनचा हा नवीन व्हेरिएंट हा मूळ ओमायक्रॉन विषाणूपेक्षा अधिक घातक असल्याचं सांगण्यात येत आहे. हा नवीन व्हेरिएंट अधिक वेगाने पसरत असून केवळ दहा आठवड्यांमध्ये ते ५७ देशांमध्ये पसरलाय. आपल्या साप्ताहिक अहवालामध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉनसंदर्भातील इशारा दिलाय.
साथीसंदर्भातील आपल्या साप्ताहिक अहवालामध्ये जागितक आरोग्य संघटनेनं मागील महिन्याभरात करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी ९३ टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत. यामध्ये बीए. १, बीए. १.१, बीए. २, बीए. ३ असे अनेक व्हेरिएंट यामध्ये आढळून आलेतयापैकी बीए. १ आणि बीए. १.१. हे सर्वात आधी आढळून आलेले ओमायक्रॉनचे सब-व्हेरिएंट होते. एकूण रुग्णसंख्येपैकी ९६ टक्के रुग्ण हे या दोन व्हेरिएंटचे आहेत. मात्र मागील काही काळापासून बीए.२ या सब व्हेरिएंटच्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसतेय. या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग त्यामधील स्पाइक प्रोटीनच्या माध्यमातून मानवी पेशींमध्ये होत असल्याचं उघड झालंय.
“बीए. २ च्या सिकवेन्सची ५७ देशांमधून गोळा केलेली माहिती सीआयएसएआयडीला पाठवण्यात आलीय,” असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. सीआयएसएआयडी ही संस्था जगभरातील करोना विषाणूंच्या जिनोम सिक्वेन्सींगवर संशोधन आणि संकलनासाठी वापरला जाणारा माहितीचा साठा आहे. नव्या रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे बीए.२ व्हेरिएंटचे आहे.
सविस्तर अभ्यासानंतर या वेगवेगळ्या व्हेरिएंटची प्रादुर्भाव होण्याची क्षमता किती आहे, संसर्गाचा वेग कसा आहे यासंदर्भातील माहिती समोर येईल असं सांगण्यात आलंय. नुकत्याच करण्यात आलेल्या काही संसोधनांमध्ये बीए. २ हा बीए. १ पेक्षा अधिक वेगाने पसरत असल्याची माहिती समोर आलीय.