Parliament Special Session Live: संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणावर चर्चा, सोनिया गांधी बोलणार?

Marathi News Live: संसदेच्या विशेष अधिवेशनात आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणार आहे.

Parliament Special Session Live Updates, 20 September 2023: संसदेचं विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून बोलवण्यात आलं आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मंत्रिमंडळ आणि सर्वपक्षीय खासदार यांच्यासह संसदेच्या नव्या इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर जे पहिलं विधेयक लोकसभेत मांडलं गेलं ते महिला आरक्षण विधेयक आहे. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली असून आज आणि उद्या यावर साधकबाधक चर्चा होणार आहे. मोदींनी हे विधेयक मांडल्यापासूनच काँग्रेस आणि भाजपा यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. अशात आज काँग्रेसतर्फे सोनिया गांधी बोलण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींवर आणि देशात तसंच राज्यात काय काय घडणार हे आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचणार आहोत.

हे वाचले का?  PM Modi calls Biden: पंतप्रधान मोदींचा बायडेन यांना फोन; युक्रेन दौरा आणि बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षिततेवर चर्चा