Praniti Shinde : “…तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील”, खासदार प्रणिती शिंदेंचं परखड मत

प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे की मुंबई तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवायला शिकवते.

Praniti Shinde महिलांना आदर दिला गेला पाहिजे. राजकारण असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन फारसा चांगला नाही. पण एक स्त्री शिकली तर ती सगळं वातावरण बदलू शकते. तसंच तिच्यामध्ये ती क्षमता असते. तिला तिच्या कपड्यांवरुन किंवा वागण्यावरुन कुठलंही लेबल लावायला नको असं मत खासदार प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांनी व्यक्त केलं आहे.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

एक स्त्री घरातलं वातावरण बदलू शकते. शाळेत शिकवलं जात नाही की महिलांचा आदर करावा. मुलांना घडवलं कसं जातं ते महत्त्वाचं आहे. त्याला घरात हे शिकवलं गेलं पाहिजे. वडिलांनी मुलाला शिकवलं की महिलेचा आदर कर, तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार बंद होतील असं मत प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोघांना उमेदवारी जाहीर; शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूरमधून…

स्त्रीला समानतेची वागणूक देणं महत्त्वाचं

घरात गणपती येतो, तेव्हा मुलगाच गणपती येतो किंवा वडील आणतात. मी महिलांना भेटते तेव्हा सांगते गणपती आणाल तेव्हा एका बाजूने तो मुलीला धरुदेत दुसऱ्या बाजूला मुलाला. जेवणासाठीच्या पंगती बसतात तेव्हा पुरुष आधी जेवतात. आम्हाला तुमच्या आधी जेवायचं नाही पण किमान तुमच्या बरोबर बसू द्या, बाजूला बसू द्या. त्याने खूप फरक पडेल. जेव्हा स्त्रीला आवाज मिळतो तिच्याच घरात तेव्हा खूप फरक पडतो असं प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) म्हणाल्या. प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांनी ‘विषय खोल’ ला मुलाखत दिली आहे. त्यात प्रणिती शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

ट्रोलर्सना मी महत्त्व देत नाही

“मी ट्रोलर्सना महत्त्व देत नाही. ट्रोलर्स बिनकामाचे असतात. तुम्ही किती परिणाम करुन घ्यायचा ते तुमच्यावर असतं. मी ट्रोल्स करणाऱ्याचे कमेंट वाचतच नाही. कारण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं. अर्थात महिलांसाठी हे ट्रोलिंग कठीण आहे. आपल्याकडे महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोन योग्य नाही. तिला कायमच जज केलं जातं. महिलेने काय कपडे घातले आहेत? ती कशी वागते हे पाहिलं जातं. राजकारणातच हे घडतं. मी महिला आहे म्हणून मला मतं द्या असं मी कधीच म्हटलेलं नाही. माझं काम पाहून मला मतदान करा, मी हेच आवाहन केलं होतं. तरीही महिलांसाठी हे इतकं सोपं नाही ही वस्तुस्थिती आहे. काही लोकांनी माझ्याविरोधातही काही गोष्टी पसरवल्या होत्या, मी पोलिसांत गेले, कोर्टात गेले. त्यानंतर अनेकजण गप्प बसले. राजकारण असो किंवा इतर कुठलंही करिअर निवडलं तरीही महिलेकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. हा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. महिलांना आदराने पाहिलं जाण्याची गरज आहे असंही प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Mangesh Sasane : “मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून, गॅझेट वाचा, अज्ञानी मागण्या…”, मंगेश ससाणेंचा मनोज जरांगेंना सल्ला

इंदिरा गांधी या माझ्या आदर्श आहेत

माझे गुरु माझे वडील आहेत. तसंच मी इंदिरा गांधींना माझे आदर्श मानते. माझ्या मतदारसंघात विडी कामगार महिला खूप आहेत. कष्ट करुन त्या विड्या वळतात, घर चालवतात. पगार, मानधन कमी असतं तरीही सण साजरे करतात, खुश राहतात. माझ्यासाठी त्या विडी कामगार महिला प्रेरणा आहेत. कालपेक्षा आज जास्त चांगलं काम करायचं आहे हे मला त्यांच्याबद्दल वाटतं असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शन रांगेसाठी ‘ स्कायवॉक ‘, १२९ कोटी खर्चाच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता