Profile is no longer available…कारण, २४ तासांच्या आत डिलीट होणार फेक अकाऊंट….

भारत सरकारचा नवा आदेश, फेक अकाऊंट तक्रारीनंतर २४ तासात डिलीट होणार

सोशल मीडियाच्या संदर्भात भारत सरकारने एक नवा निर्णय घेतला आहे. ज्या सोशल मीडिया अकाऊंटला प्रसिद्ध व्यक्तींचे किंवा स्वतःव्यतिरिक्त इतरांचे फोटो आहेत, असे अकाऊंट्स २४ तासात डिलीट करण्यात येणार आहे. या व्यक्तींनी खुद्द तक्रार केली किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने तक्रार केल्यानंतर २४ तासांमध्ये ही कारवाई होणार आहे.

सरकारने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्यूब अशा सर्व सोशल मीडिया कंपन्यांना हा नियम सक्तीचा केला आहे. सरकारकडून सांगण्यात आलं की हा नियम माहिती तंत्रज्ञान कायद्याचाच भाग असेल. त्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार आल्यानंतर त्वरीत कारवाई करावी लागेल.

हे वाचले का?  IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

म्हणजे जर एखादा अभिनेता, क्रिकेटर, राजकीय नेते किंवा कोणतीही व्यक्ती यांचा फोटो प्रोफाईलला वापरला असेल आणि या व्यक्तींनी किंवा त्यांच्या संबंधितांनी या फोटोवर आक्षेप घेत सोशल मीडिया कंपनीकडे तक्रार केली, तर कंपनीला २४ तासात ते प्रोफाईल बंद करणं बंधनकारक असेल. मग हा फोटो लाईक्स मिळवण्याच्या हेतूने वापरलेला असो अथवा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यासाठी वापरला असो, तक्रार आल्यानंतर हे प्रोफाईल बंद करावंच लागेल.

हे वाचले का?  महामतदान २० नोव्हेंबरला! राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २३ नोव्हेंबर रोजी निकाल

अनेक कारणांसाठी अशी फेक अकाऊंट तयार करण्यात येतात. या अकाऊंटला प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो लावले जातात. खोडी काढण्यासाठी किंवा गुन्हा करण्यासाठीही ही अकाऊंट तयार केली जातात. अशा अकाऊंटच्या माध्यमातून अनेकदा आर्थिक फसवणूकही केली जाते. प्रसिद्ध व्यक्तींचे चाहते बऱ्याचदा असे प्रोफाईल्स तयार करतात.