Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोघांना उमेदवारी जाहीर; शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूरमधून…

मनसेने शिवडी आणि पंढरपूर या दोन मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवडी मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर…

Raj Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा अद्याप झालेली नसली, तरी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा अॅक्शन मोडमध्ये आहेत. राज ठाकरे यांनी त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. ते आज सोलापूरमध्ये आहेत. दरम्यान आज सोलापूरमध्ये असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.

हे वाचले का?  अतिवृष्टीमुळे रायगडला पुराचा तडाखा; महाड, रोहा, पाली, नागोठणे येथे पूरस्थिती

मनसेने शिवडी आणि पंढरपूर या दोन मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवडी मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते राज्यातील विविध मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत २२५ ते २५० जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता सध्या राज ठाकरेंकडून या जागांसाठी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. त्यापैकी दोन ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

हे वाचले का?  Maharashtra News Live: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “त्याला पाच कोटी आणि…”