देशातील अनेक शहरांमध्ये जिओचे ५ जी नेटवर्क सुरू झाले आहे.
सध्या देशभरात Reliance Jio हे सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील अनेक शहरांमध्ये जिओचे ५ जी नेटवर्क सुरू झाले आहे. जिओच्या बाबतीत आता एक मोठी माहिती समोर आली आहे. जिओ वापरकर्त्यांनी एका महिन्यात थोडे थोडकं नव्हे तर तब्बल १० एक्झाबाइट्स म्हणजेच १० अब्ज जीबी डेटा वापरला आहे. २०१६ ला रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर हा सर्वात मोठा आकडा आहे.
इतिहासमध्येच प्रथमच एकाच कंपनीच्या वापरकर्त्यांनी १० एक्झाबाइट्स डेटा वापरला आहे. याआधी देशभरात उपलब्ध असणाऱ्या सर्व नेटवर्कवरील डेटाचा वापर फक्त ४. ६ एक्झाबाइट्स इतका होता. मार्च तिमाहीमध्ये jio नेटवर्कवरील डेटाचा वापराचा आकडा हा ३०.३ एक्झाबाइट इतका होता. रिलायन्स जिओने आपल्या तिमाही निकालामध्ये याचा खुलासा केला आहे.
Jio टू 5G (Jio True SG) रोलआउटने डेटा वापर वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. Jio वापरकर्ते आता दरमहा सरासरी २३.१ GB डेटा खर्च करत आहेत. प्रत्येक Jio वापरकर्ता २ वर्षांपूर्वीच्या तुलनेत दरमहा सुमारे १० GB अधिक डेटा वापरत आहे. जिओ नेटवर्कवरील डेटा वापराची ही सरासरी टेलिकॉम उद्योगाच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे.
२३०० पेक्षा जास्त शहरांमध्ये ५ जी सेवा
तिमाही निकालांनुसार,मार्च २०२३ पर्यंत ६० हजार साईट्सवर ३. ५ लाख ५जी सेल स्थापित केले होते. देशभरातील २३०० पेक्षा जास्त शहरांमध्ये जिओने आपली ५ जी सेवा सुरु केली आहे. मोठ्या संख्येने लोकं जिओची ५जी सेवा वापरत आहेत. खूप वेगाने ५जी सेवा सर्वत्र रोलआऊट करत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या वर्ष अखेरपर्यंत संपूर्ण देशामध्ये ५जी सेवा सुरु करण्याचे जिओचे उद्दिष्ट आहे.
5G रोलआउटसोबतच कंपनी AirFiber लॉन्च करण्याचीही तयारी करत आहे. जिओने येत्या काही महिन्यांत त्याचे लॉन्चिंग शक्य असल्याचे सांगितले. फायबर आणि एअरफायबरने १० कोटी घरे जोडण्याचे रिलायन्स जिओचे उद्दिष्ट आहे.