Russia Ukraine War Live : Googleनेही घेतली रशियाविरुद्ध भूमिका; जाहिरातींवर झाला ‘हा’ परिणाम

Ukraine Russia Crisis Live: पाश्चिमात्य देशांनी कायम युक्रेनला शस्त्रपुरवठा केला आहे, त्याच्या फौजांना प्रशिक्षण दिले आहे, असा रशियाचा आरोप आहे.

Russia Ukraine Crisis Live: युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी बोलणी करण्यास रशिया तयार आहे, मात्र युक्रेनची लष्करी आधारभूत संरचना नष्ट करण्यासाठीचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅवरॉव्ह यांनी म्हटले आहे.या आठवडय़ाच्या सुरुवातीला युक्रेनतर्फे वाटाघाटीस आलेल्यांना रशियन प्रतिनिधीमंडळाने आपल्या मागण्या सादर केल्या असून, गुरुवारी होणाऱ्या बोलण्यांसाठी युक्रेनच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहात आहोत, असे लॅवरॉव्ह यांनी सांगितले.


पाश्चिमात्य देशांनी कायम युक्रेनला शस्त्रपुरवठा केला आहे, त्याच्या फौजांना प्रशिक्षण दिले आहे आणि युक्रेनचे रूपांतर रशियाविरोधी तटबंदीत करण्यासाठी तेथे तळ बांधले आहेत, असा आरोप लॅवरॉव्ह यांनी केला. यामुळे आपल्या सुरक्षितलेला धोका निर्माण झाल्यामुळेच आपल्याला युक्रेनविरुद्ध कारवाई करणे भाग पडले, असे रशियाचे म्हणणे आहे.sia Ukraine War News Live: एका आठवडय़ापूर्वी सुरू झालेल्या रशियाच्या लष्करी आक्रमणात आतापर्यंत २२७ नागरिक ठार, तर ५२५ नागरिक जखमी झाले असल्याचे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने म्हटले आहे.SortLatestOldest11:12 (IST) 4 Mar 2022गुगलनेही घेतली रशियाविरुद्ध भूमिका; जाहिरातींवर झाला ‘हा’ परिणाम

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन

Google ने गुरुवारी सांगितलं की त्यांनी रशियामध्ये ऑनलाइन जाहिरातींची विक्री थांबवली आहे. ही बंदी सर्चिंग, युट्यूब आणि गुगलशी संबंधित सर्वच प्लॅटफॉर्म्सला लागू होणार आहे. ट्वीटर आणि स्नॅपनेही रशियाविरुद्ध असंच पाऊल उचललेलं आहे. सध्या घडामोडी वेगाने घडत आहेत. आम्ही याबद्दलच्या पुढच्या सूचना योग्य वेळ आल्यावर देऊ, असंही गुगलने सांगितलं आहेरशियाने युक्रेवर केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध थांबवावे यासाठी अमेरिकेसह अनेक युरोपीन राष्ट्रांकडून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. मात्र तरीही रशियाने युद्ध सुरूच ठेवले आहे. या युद्धात आता फ्रान्सने युक्रेनला पाठिंबा दिला आहे. फ्रान्स युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा करणार आहे.10:00 (IST) 4 Mar 2022भारतीय रेस्टॉरंट युक्रेनमधून बाहेर काढलेल्या भारतीयांना देतंय मोफत जेवण

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार

महाराजा, बुडापेस्टमधील सर्वात जुने भारतीय रेस्टॉरंट, हंगेरीच्या राजधानीमार्गे युद्धग्रस्त युक्रेनमधून बाहेर काढलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोफत जेवण देत आहे. कुलविंदर सिंग झाम, रेस्टॉरंटचे मालक हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना म्हणाले की, एक धर्माभिमानी शीख असल्याने, त्यांनी त्वरित मोफत भोजन देण्यासाठी लंगर (सामुदायिक स्वयंपाकघर) उघडले. ” त्यांची संख्या एवढ्या वेगाने वाढेल याची मला कल्पना नव्हती. मंगळवारी ३०० विद्यार्थी बुडापेस्टमध्ये दाखल झाले. बुधवारी दुपारी, आम्ही ८०० विद्यार्थ्यांसाठी जेवण तयार केले आणि रात्री आणखी १,५०० विद्यार्थी आले09:28 (IST) 

हे वाचले का?  Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

दोन दिवसांपूर्वीच रशियन सैन्याच्या गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये झालेल्या गोळीबारात जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.