Samsung चा चीनला झटका; ४,८२५ कोटींच्या गुंतवणुकीसह भारतात उभारणार प्रकल्प

प्रत्यक्ष. प्रत्यक्ष रोजगारही निर्माण होणार

गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या कंपन्या चीनमधून काढता पाय घेऊन भारतात गुंतवणूक करत आहे. अशातच मल्टी नॅशनल कंपनी सॅमसंगनंही चीनला मोठा झटका दिला आहे. सॅमसंगनं उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आपलं डिस्प्ले युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत नोएडामध्ये सॅमसंगला ओएलईडी डिस्प्ले युनिट उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प सुरू करताना भारत सरकारनं सुरू केलेल्या स्कीम फॉर प्रमोशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक कंपोनंट्स अँड सेमीकंडक्टर्स (एसपीईसीएस) अंतर्गत ४६० कोची रूपयांची आर्थिक मदत मिळेल.

हे वाचले का?  इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

या प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश सरकार इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग धोरणाअंतर्गत अनुदान आणि स्टँप ड्युटीमध्ये कंपनीला सूट देणार आहे. चीनमधून सॅमसंग आपला हा व्यवसाय गुंडाळणार असून तो भारतात सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सॅमसंग भारतात ४ हजार ८२५ कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर १ हजार ५१० प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. तर मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष रोजगारही सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

जगभरात टीव्ही, मोबाईल, टॅब, घड्याळं यांच्यात वापरले जाणारे ७० टक्के डिस्प्ले हे सॅमसंग तयार करते. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील संपूर्ण जगभरात हे डिस्प्ले निर्यात केले जातील. सद्यस्थितीतही सॅमसंग उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा निर्यातदार आहे. गेल्या वर्षी सॅमसंगनं २.७ अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती. पुढील पाच वर्षांमध्ये कंपनीनं ५० अब्ज डॉलर्सची निर्यात करण्याचं ध्येय ठेवलं आहे. सॅमसंग डिस्प्ले युनिटला केस टू केस मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन मंत्र्यांच्या समितीची स्थापना केली होती. कंपनीला विशेष मदतीसाठी या समितीनं काही सूचनाही केल्या होत्या.