अभिनव भारत मंदिरासाठी सहा कोटींचा आराखडा

अभिनव भारत मंदिरासाठी सहा कोटींचा आराखडा
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 2 मिनिट )

नाशिकमधील तिळभांडेश्वर येथील ‘अभिनव भारत मंदिरा’च्या जीर्णोद्धारासाठी सहा कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाची माहिती नवीन पिढीला मिळावी, यासाठी हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कामाला पुन्हा सुरुवात झाली असून लवकरच पहिला स्लॅब पडणार आहे.

स्मारकाच्या कामाचा पाया पूर्ण झाला असून, ज्या ठिकाणी प्रतिकृती ठेवायची आहे त्या ठिकाणचे कामही पूर्ण झाले आहे. प्रतिकृतीसोबत माहितीफलकही लावण्यात येणार असून, त्या काळातील ऐतिहासिक संदर्भ उलगडले जाणार आहेत. तसेच नागरिकांना बसण्यासाठी ऑडिटोरियमचेही काम प्रगतिपथावर आहे.

सन १८९९ ते १९०९ दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी वास्तव्यास होते. इंग्रजांविरोधात नेमका कशा पद्धतीने लढा द्यायचा, त्यासाठी गुप्त बैठका कुठे घ्यायच्या आणि क्रांतीकारकांना कसे मार्गदर्शन करायचे, याची रणनिती याच संस्थेच्या कार्यालयात आखली जायची याची माहितीदेखील उपलब्ध होणार आहे. त्यावेळचे काही पत्रव्यवहार, दस्तऐवज आणि आठवणी या ठिकाणी पाहता येणार आहेत

  • बाबाराव सावरकर, अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांच्या नावाने दालने
  • सावरकरांना अभिप्रेत तुळशी वृंदावनावर १८५७ ते १९४७ या दरम्यान हुतात्मा झालेल्यांची नाव
  • स्वातंत्र्यदेवतेची स्थापना करून तिच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म, तलवार अशी आयुधे
  • मिनी थिएटर, अद्ययावत ग्रंथालय, संग्रहालय, क्रांतिकारकांची छायाचित्रे, सावरकरांचे समग्र साहित्य
  • मराठी शब्दकोश, स्वातंत्र्य चळवळीविषयीच्या छायाचित्रांची गॅलरी, तसेच प्रदर्शन हॉल उभारण्यात येणार