School Reopening in Maharashtra : शाळा १७ ऑगस्टपासून?

प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्य़ांत शिक्षण विभागाची चाचपणी

प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्य़ांत शिक्षण विभागाची चाचपणी

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या गावांमधील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केल्यानंतर निर्बंध शिथिल झालेल्या नगरपालिका, नगर परिषदा आणि महापालिका क्षेत्रातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्गही १७ ऑगस्टपासून सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने चाचपणी सुरू केली आहे. त्याचबरोबर करोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्गही सुरू करण्यात येणार आहेत.

ज्या गावात महिनाभर करोनाचा एकही बाधित आढळून आलेला नाही, तिथले इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार पहिल्या ५,६०० शाळा सुरू झाल्या. दरम्यान नाशिकमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या भागातील शाळा पालक मंत्र्यांच्या आदेशाने बंद करण्यात आल्या. मात्र आता पुन्हा शाळा लवकरात लवकर सुरू कराव्या, यासाठी शिक्षक, पालक, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या, संस्था, व्यक्ती यांच्याकडून आग्रह वाढला आहे.

हे वाचले का?  Lateral entry ad cancel: वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट भरती अखेर UPSC कडून रद्द; विरोधकांच्या दबावानंतर केंद्र सरकारचे घुमजाव

अनेक गावांमध्ये मोबाइल, संगणक, इंटरनेट सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यास मर्यादा आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांसह शिक्षक, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले कार्यकर्ते, संस्था आदींकडून शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

सध्याची उपस्थिती दहा टक्के.. 

राज्यातील आठवी ते दहावीचे वर्ग २७ जुलैपासून सुरू करण्यात आले. सध्या राज्यातील १२ हजार ७२५ शाळा सुरू करण्यात आल्या असून तेथे साधारण साडेदहा टक्के  उपस्थिती आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, रायगड, रत्नागिरी, सातारा, नगर, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्य़ांमध्ये शाळा सुरू झाल्या नाहीत.

हे वाचले का?  “केंद्रातील मोदी सरकार निगरगट्ट”, नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंचं टीकास्र; म्हणाल्या, “आम्ही शिक्षणमंत्र्यांचा…”

बैठकीतला निर्णय..

राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागावर सोपविल्याने विभागाने शुक्र वारी बैठक घेऊन याबाबत चर्चा के ली. शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय यात झाला. मात्र, कुठल्या भागातील शाळा सुरू करायच्या याबाबतचे निकष पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत निश्चित के ले जातील, असे वर्षां गायकवाड यांनी सांगितले.

व्यवहार पूर्वपदावर आल्यामुळे..

* राज्यातील अनेक भागातील निर्बंध ३ ऑगस्टपासून शिथिल करण्यात आले आहेत. तसेच, मुंबई, ठाण्यातील अनेक व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.

हे वाचले का?  IAS Puja Khedkar used OBC quota : कोट्यवधींची संपत्ती असलेल्या पूजा खेडकर यांनी MBBS चा प्रवेशही ओबीसी कोट्यातून घेतला

* त्यामुळे या भागातील शाळा सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी शुक्रवारी सांगितले.