शनिशिंगणापूर देवस्थानवर जिल्हाधिकारी यांना शासनाने प्रशासक म्हणून नेमले व नवीन कायद्याची अंमलबाजवणी करण्याचे आदेश दिले त्याविरोधात विश्वस्त मंडळ संभाजीनगर खंडपिठात गेले असता आहे ती परिस्थिती ठेवण्याचे न्यायालयाने सांगितले परंतु बँकेतील सह्यांचे अधिकार विश्वस्त मंडळाचेच असून आम्हीच कारभार पाहणार असल्याचे त्यांच्या वतीने सांगितले जात आहे.
रविवार (दि 5 ऑक्टोबर) रोजी अध्यक्षांनी विश्वस्त मंडळाबरोबर चर्चा करून कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांना कामाबाबत सूचना केल्या. त्याचबरोबर नूतन समितीचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे व सचिव राजेंद्र वाकचौरे यांनीसुद्धा मंदिरात भेट दिली. देवस्थानच्या वतीने अॅड. सतीश तळेकर यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की 22 ऑक्टोबर पर्यंत कायदा अस्तित्वात येण्याच्या तारखेबाबत कुठलीही अधिसूचना जारी केली नाही. एसएसडीटी कायद्याच्या कलम 5 अंतर्गत आवश्यक असलेली व्यवस्थापन समिती कधीही स्थापन करण्यात आली नव्हती आणि तरीही सरकारने कलम 36 अंतर्गत अधिकारांचा वापर केला.
एस. एस. डी. टी. कायदा आणि प्रशासक म्हणून जिल्हाधिकार्यांची नियुक्ती केली, जी बेकायदेशीर आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की नियम अजिबात तयार केलेले नाहीत. असे अनेक मुद्दे मांडले. यावर जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहे. व 10 नोव्हेंबर पुढची तारीख मिळाली आहे.



