Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा

Suryakumar Yadav : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पहिला सामना डर्बन येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने ६१ धावांनी विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली.

IND vs SA Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen : भारतीय संघाने डर्बन येथील पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ६१ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात संजू सॅमसनने शतकी खेळी साकारत भारतीय संघाला २०२ धावांचा डोंगर उभारुन देण्यात महत्त्वाची बजावली. यानंतर आपल्या धावंसख्येचा बचाव करताना वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई या भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. या खेळाडूंमुळेच टीम इंडिया सामना जिंकण्यात यशस्वी ठरली. दरम्यान या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मार्को यान्सन यांच्यात वादावादी झाली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचले का?  रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या L&T च्या अध्याक्षांना कर्मचाऱ्यांपेक्षा ५०० पट अधिक वेतन, २०२३-२४ साठी मिळाले ५१ कोटी रुपये

वास्तविक, दक्षिण आफ्रिकेच्या डावातील १५व्या षटकात मोठे नाट्य पाहायला मिळाले. हे षटक रवी बिश्नोईने टाकत होता आणि त्याच्या दुसऱ्या चेंडूवर गेराल्ड गोएत्झीने एक धाव घेतली. त्यानंतर अर्शदीप सिंगने चेंडू पकडला आणि तो यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या दिशेने फेकला. हा थ्रो पकडण्यासाठी संजू खेळपट्टीच्या दिशेने पोहोचला होता, त्यानंतर आफ्रिकन खेळाडू मार्को जॅन्सनला कदाचित हे आवडले नाही, ज्यामुळे तो संजू सॅमसनला काही तरी म्हणाला आणि येथून वादाची ठिणगी पडली.यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने यष्टिरक्षक संजूच्या बचावात मार्को यान्सनशी बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली, त्यानंतर अंपायरही त्यांच्याकडे धावत आले. आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संजू सॅमसनने शतक झळकावत केला मोठा पराक्रम –

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय संघाला अभिषेक शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला. मात्र, यानंतर संजू सॅमसनने तुफानी खेळी करत पहिल्यांदा अवघ्या २७ चेंडूत आणि अर्धशतक आणि ४७ चेंडूत आपले सलग दुसरे टी-२० शतक पूर्ण करत इतिहास घडवला. तो भारतासाठी सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर ही कामगिरी करणारा जगातील चौथा फलंदाजा ठरला आहे. त्याने ५० चेंडूचा सामना करताना ५० चेंडूत ७ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १०७ धावांची झुंजार खेळी साकारली. ज्यामुळे भारतीय संघाला २०२ धावांचा डोंगर उभारण्यात यश आले.

हे वाचले का?  ‘इस्रो’चे शतकी उड्डाण

भारतीय गोलंदाजांनी केला कहर –

दक्षिण आफ्रिका संघ सुरुवातीपासूनच २०३ धावांचा पाठलाग करतना मोठी भागीदारी रचण्यासाठी धडपडत असल्याचे दिसत होता. यजमान संघाच्या ४४ धावांपर्यंत ३ विकेट्स पडल्या होत्या. त्यानंतर धावसंख्या ९३ धावांपर्यंत पोहोचली तोपर्यंत आफ्रिकेचे ७ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. परिस्थिती अशी होती की दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या १० षटकांत १२५ धावा करायच्या होत्या, मात्र मधल्या षटकांमध्ये वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांच्या घातक गोलंदाजीमुळे टीम इंडियाला सामना जिंकण्यात यश आले. या दोघांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, त्याशिवाय आवेश खाननेही दोन आणि अर्शदीप सिंगने एक विकेट घेतली.