Tokyo 2020: भारताच्या खात्यात तिसरं पदक; लव्हलिनाला बॉक्सिंगमध्ये कांस्य

लव्हलिनाची उपांत्य फेरीत टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीशी लढत झाली

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लवलिनाला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत लवलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. या पराभवामुळे लवलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे. आसामच्या २३ वर्षीय लवलिनाने उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला ३-२ असे नमवले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपईच्या नीन-शेन चेनला ४-१ अशी धूळ चारून तिने पदक पक्के केले होते.

हे वाचले का?  SBI Fake Branch : चित्रपटाला शोभेल अशी कथा! चक्क SBI ची बनावट शाखा सुरू केली, खोट्या नियुक्त्या अन् बरंच काही; कुठे घडला हा भयंकर प्रकार?

लव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीच्या सामन्यात टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीकडून पराभूत झाली आहे. सामन्यामध्ये लव्हलिनाने तिन्ही फेऱ्या गमावल्या. त्यामुळे लव्हलिनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लव्हलिना तिसरी बॉक्सर बनली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या बॉक्सरसमोर मात्र, लव्हलिनाने चांगली लढत दिली. लव्हलिनाच्या कांस्यपदकासह भारताच्या नावावर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आता तीन पदके झाली आहेत.

हे वाचले का?  अंतराळातील कचऱ्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

लव्हलिना बोर्गोहाइन उपांत्य फेरीत विश्वविजेत्या टर्कीच्या बुसेनाझ सुर्मीनेली विरुद्ध हरली आहे. लव्हलिनाचा ०-५ ने पराभव झाला. लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाचा टोक्यो ऑलिम्पिकमधला प्रवास कांस्यपदकासह समाप्त झाला आहे. लव्हलिनाने सामना गमावला, पण तिने विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीला कडवे आव्हान दिले होते.