Ukraine War: आर्थिक निर्बंधावर मात करण्यासाठी रशिया घेणार बिटकॉइनचा आधार?

क्रिप्टोकरन्सीचा अवलंब वाढल्याने रशियाला आर्थिक निर्बंधांच्या पहिल्या लाटेपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) निर्बंध लागू करण्यासाठी बँकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात.

रशियाने युक्रेनवर हल्ले सुरु केल्यानंतर अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी रशियाला काय निर्यात करता येईल यावर नवीन निर्बंध आणि मर्यादा जाहीर केल्या आहेत. अमेरिकेतील पाच सर्वात मोठ्या रशियन बँकांवर टाच आणली असून त्यांची सर्व मालमत्ता गोठवली जाणार आहे. याची किंमत १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. मात्र असं असलं तरी क्रिप्टोकरन्सीचा अवलंब वाढल्याने रशियाला आर्थिक निर्बंधांच्या पहिल्या लाटेपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) निर्बंध लागू करण्यासाठी बँकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. मात्र डिजिटल चलन जागतिक बँकिंग नियमांच्या कक्षेबाहेर असल्याने, क्रिप्टोकरन्सी रशियाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयास येऊ शकते. युद्धाला सुरुवात झाली तेव्हा क्रिप्टोकरन्सीत घसरण दिसून आली होती. मात्र आता बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या किमतींमध्ये काही प्रमाणात स्थिरता आली आहे.

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन

फर्म क्वांटम इकॉनॉमिक्सचे संस्थापक आणि सीईओ मॅटी ग्रीनस्पॅन यांनी ब्लूमबर्गला सांगितले, “जर दोन लोक किंवा संस्था एकमेकांसोबत व्यवसाय करू इच्छित असतील आणि बँकांद्वारे तसे करू शकत नसतील, तर ते बिटकॉइनसह करू शकतात. जर एखाद्या धनाढ्य व्यक्तीला असे वाटत असेल की निर्बंधांमुळे त्याचे खाते बंद होऊ शकते, तर तो हे टाळण्यासाठी त्याचे पैसे बिटकॉइनमध्ये बदलू शकतो.”

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी