अमेरिकेत करोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे
अमेरिकेत करोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर गुगल, फेसबुकपाठोपाठ ऑफिसला येण्यासाठी मायक्रोसॉफ्टनेही अट ठेवली आहे दरम्यान, ऑफिसमध्ये येण्यापुर्वी कर्मचारी आणि विक्रेत्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे अवाश्यक केले आहे. पुढील महिन्यात अमेरिकेत मायक्रोसॉफ्टचे ऑफिस पुर्णपणे सुरु होणार होते.
“आम्हाला सर्व कर्मचारी, विक्रेते आणि अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट कार्यालयामध्ये प्रवेश करणाऱ्या कोणत्याही कर्मचारी, ग्राहक यांना लसीकरणाचा पुरावा दाखवने बंधनकारक राहील. तसेच कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था असेल,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
लसीकरणाच्या पुराव्याबाबत नवीन निर्देशाव्यतिरिक्त, कंपनीने आपली कार्यालये पूर्णपणे उघडण्याची मुदत वाढवली आहे. यापूर्वी ७ सप्टेंबरपर्यंत असे करण्याचे नियोजन केले असताना, मायक्रोसॉफ्ट आता ४ ऑक्टोबरनंतरच आपली यूएसमधील कार्यालये पूर्णपणे उघडेल. तसेच मायक्रोसॉफ्टने असेही म्हटले आहे की, जे कर्मचारी लहान मुलांचे पालक आहेत, जे लसीकरण करू शकत नाहीत ते पुढील वर्षी जानेवारीपर्यंत घरून काम करू शकतील.
कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही नवीन घडामोडींचा बारकाईने मागोवा घेतो आणि ही परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतो. साथीच्या प्रारंभापासून आम्ही असे केले आहे”
मायक्रोसॉफ्ट कार्यालयात येण्यासाठी लसीकरणाचा पुरावा दाखवण्याची योजणा आखली आहे. यापुर्वी गुगल आणि फेसबुकने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी गेल्या महिन्याच्या अखेरीस याची घोषणा केली.
दोन्ही टेक दिग्गजांनी त्यांची कार्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी अपेक्षित तारखा पुढे ढकलल्या आहेत. कार्यालये काहींसाठी खुली असली तरी, कंपन्यांकडे स्वैच्छिक वर्क-फ्रॉम होम पॉलिसी आहे ज्या अंतर्गत कर्मतारी त्यांच्या घरातून काम करु शकतात.