VI ने लॉन्च केले ‘हे’ जबरदस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स; नाईट डेटासह मिळणार…., एकदा पहाच

व्हीआय लवकरच आपले ५जी नेटवर्क लॉन्च करू शकते.

Vodafone-Idea ही भारतातील एक टेलिकॉम कंपनी आहे. व्हीआयला अजून आपले ५ जी नेटवर्क सुरु करता आलेले नाही. त्यामुळे कंपनी ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत आहे. तसेच व्हीआय लवकरच आपले ५जी नेटवर्क लॉन्च करू शकते. कंपनीने एकूण तीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केले असून त्यातील दोन हे स्वस्त आणि एक महाग प्लॅन लॉन्च केला आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

वोडाफोन-आयडिया टेलिकॉम कंपनीने १७, ५७ आणि १,९९९ रुपयांचे तीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केले असून त्यामध्ये ग्राहकांना कोणकोणते फायदे मिळणार आहेत ते पाहुयात. याबाबतचे वृत्त 91mobiles ने दिले आहे.

हे वाचले का?  ‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत

व्हीआयचा १७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

वोडाफोन आयडियाने लॉन्च केलेल्या १७ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २४ तासांची वैधता मिळते. या पॅकमध्ये कंपनी रात्री १२ ते पहाटे ६ पर्यंत नाईट डेटा ऑफर करते. महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएससह कोणतेही फायदे दिले जात नाहीत.

व्हीआयचा ५७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

व्हीआयच्या ५७ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला ७ दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड नाईट डेटा मिळतो. मात्र यामध्ये इतर कोणतेही फायदे तुम्हाला मिळत नाहीत.

व्हीआयचा १,९९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

वोडफोन-आयडियाने १,९९९ रुपयांचा एक रीचार्ज प्लॅन आणला आहे. त्यामध्ये ग्राहकांना २५० दिवसांची वैधता मिळते. तसेच १.५ जीबी डेली डेटा, दररोज १०० एसएमएस करण्याचे फायदे मिळतात.

हे वाचले का?  Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!

व्हीआयने आपले ९९ आणि १२८ रुपयांचे जे रिचार्ज प्लॅन्स आहेत. त्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची वैधता कमी केली आहे. Q4 FY23 मध्ये टेल्कोच्या ARPU मध्ये QoQ वाढ झाली नाही. ९९ आणि १२८ रुपयांच्या प्लॅनची वैधता कमी केल्यामुळे व्हीआयला फार मदत मिळणार आहे. कंपनीने या प्लॅनची वैधता कमी केल्याचा अर्थ असा आहे, जे ग्राहक एका महिन्यासाठी ९९ रुपयांचा प्लॅन रिचार्ज करतात. त्यांना आता महिन्यातून दोनवर रिचार्ज करावे लागणार आहे. यामुळे व्हीआयचा महसूल वाढण्यास मदत होणार आहे. तसेच ARPU देकील वाढू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे हे बदल सध्या मुंबईच्या टेलिकॉम सर्कलमध्ये दिसत आहेत.

हे वाचले का?  पूर्व लडाखमध्ये सैन्यमाघारी पूर्ण, भारत-चीन सैनिकांमध्ये आज दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण