Video: ‘५० खोके…’नंतर आता ”गद्दारांना भाजपाची…’, गुवाहाटीचा उल्लेख करत घोषणाबाजी; आदित्य ठाकरे, अजित पवारांनीही दिल्या घोषणा

‘आले रे आले पन्नास खोके आले..खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो,’ अशा घोषणा काल देण्यात आल्या होत्या.

‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केल्यानंतर आजही असाच प्रकार विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ पहायला मिळाला. आज थेट शिवसेनेचे फुटीरतावादी नेते एकनाथ शिंदे जून महिन्यात बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीला वास्तव्यास होतो याच मुद्द्यावरुन विरोधकांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

‘ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा…’, ‘ईडी सरकार हाय हाय..’, ‘फसवी मदत जाहीर करणार्‍या सरकारचा धिक्कार असो…’, ‘नही चलेगी… नही चलेगी दादागिरी नही चलेगी…’, ‘सरकार हमसे डरती है ईडी को आगे करती है…’, ‘फिफ्टी- फिफ्टी… चलो गुवाहटी…’, ‘गद्दारांना भाजपाची ताट – वाटी… चलो गुवाहाटी… चलो गुवाहाटी…’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर आजही दणाणून सोडला. बुधवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधी पक्षाच्यावतीने आजही विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांमध्ये छगन भुजबळ, अजित पवार, आदित्य ठाकरे, प्रणिती शिंदे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, वर्षा गायकवाड हे आमदार उपस्थित होते. ‘५० खोके… एकदम ओके…’, ‘ईडी सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… बेकायदा सरकार हाय हाय…’, अशा घोषणांनी विरोधी पक्षांच्या आमदारांनी दिल्याचं पहायला मिळालं.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा

काल पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री शिंदे सव्वा दहाच्या सुमारास विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सहकाऱ्यांसोबत अभिवादन केलं. यानंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यासहीत समर्थक आमदार सभागृहात येत असतानाच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच जोरदार घोषणाबाजी केली. ‘आले रे आले पन्नास खोके आले..खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो’, ‘आले रे आले गद्दार आले’, ‘ईडी सरकार हाय हाय,.स्थगिती सरकार हाय. हाय’. अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. शिवसेनेतून बंडखोरी करुन बाहेर पडलेले ४० आमदार आणि १० अपक्ष आमदारांनी ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला जात आहे. याच आरोपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी विधानसभेमध्ये ५० खोकेंवाली घोषणा चांगलीच चर्चेत राहिली.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारनं थांबवला, नवे अर्जही स्वीकारणं बंद; नेमकं कारण काय?