West Bengal Train Accident : पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात! मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक; पाच जणांचा मृत्यू, २५ जखमी

Kanchenjunga Express Accident : आज सकाळी न्यू जलपाईगुडी येथे ही घटना घडली असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पश्चिम बंगालमध्ये मालगाडीने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास न्यू जलपाईगुडी येथे ही घटना घडली. दरम्यान, मालगाडीने धडक दिल्यानंतर कंचनजंगा एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले होते.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही मालगाडी अगरतलावरून सियालदाह येथे जात होती. यावेळी या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. ही धडकी इतकी जोरदार होती, की यावेळी कंचनजंगा एक्सप्रेसलाचे काही डबे थेट रुळावरून खाली घसरले.

पाच जणांचा मृत्यू, २५ जखमी

या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची अतिरिक्त पोलिस अधिक्षक अभिषेक रॉय यांनी दिली आहे. तसेच या ठिकाणी रेक्यू टीम दाखल झाली असून बचाव कार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलं.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?

रेल्वेमंत्र्यांनीही दिली प्रतिक्रिया

दरम्यान, या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. न्यू जलपाईगुडी येथे झालेला अपघात दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. याबरोबरच या ठिकाणी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

हे वाचले का?  Gautam Adani Fraud: गौतम अदाणींनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत गुन्हा दाखल, शेअर बाजार गडगडला