Womens T20 World Cup Updates: पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव करून इंग्लंड ६ गुणांसह गुणतक्त्यात अव्वल ठरला. उपांत्य फेरीत त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल, तर उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल.
Womens T20 World Cup 2023: मंगळवारी महिला टी-२० विश्वचषकात इंग्लंडने पाकिस्तानवर ११४ धावांनी मोठा विजय नोंदवला. पाकिस्तानच्या या दारुण पराभवाचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. कारण जर पाकिस्तान संघाने इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत केले असते, तर इंग्लंडचा संघ भारतापेक्षा ६ गुणांनी कमी नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला असता. अशा परिस्थितीत भारत ब गटातील अव्वल ठरला स्थानी राहिला असता.
ज्यामुळे भारताचा सामना अ गटातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील दक्षिण आफ्रिकेशी झाला असता. ज्यांना लीग टप्प्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र पाकिस्तानच्या मानहानीकारक पराभवाने सर्व समीकरणे बदलली असून आता भारताचा सामना विजयाच्या रथावर स्वार असलेल्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ज्यांनी या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही.
दोन्ही संघांचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास –
भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ७ विकेटने पराभव केला होता. वेस्ट इंडिजचा ६ गडी राखून पराभव केला होता, पण तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने त्यांचा ११ धावांनी पराभव केला. यानंतर, शेवटच्या साखळी सामन्यात, संघाने डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार आयर्लंडचा ५ धावांनी पराभव केला.
ऑस्ट्रेलिया हा स्पर्धेतील अ गटातील पहिला संघ ठरला आहे, ज्याने त्यांचे चारही साखळी सामने जिंकले आहेत. ब गटात इंग्लंडने हा पराक्रम केला. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ९७ धावांनी पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेच्या संघाचा १० गडी राखून धुव्वा उडवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.