Xiaomi Smartphones: भारतात ‘या’ दिवशी लॉन्च होणार Xiaomi 13 Pro, DSLR ला टक्कर देणार ५० मेगापिक्सलचा कॅमेरा

Xiaomi 13 Pro या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ४८२० mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे.

Xiaomi ही एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. Xiaomi कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत आपला आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करणार आहे . शाओमी कंपनीने Xiaomi 13 Pro बद्दल माहिती दिली आहे. कंपनी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच लॉन्च करणार असून त्यापूर्वीच याचे फीचर्स समोर आले आहेत.

Xiaomi 13 Pro चे स्पेसिफिकेशन

सध्या Xiaomi कडून Xiaomi 13 Pro च्या स्पेसिफिकेशनबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा फोन लॉन्च होण्यापूर्वीच त्याचे फीचर्स लॉन्च झाले आहेत. कंपनीने आपल्या स्थानिक बाजारात हा फोन लॉन्च केला असून भारतात देखील त्याच फीचर्स आणि स्पेसिफिकेशनसोबत लॉन्च होणार आहे. आपण याच्या चायना व्हेरिएंटमध्ये बोलायचे झाल्यास त्यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 हा प्रोसेसर असणार आहे. यामध्ये ६.७३ इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले मिळतो. त्यामध्ये 12 GB LPDDR5X RAM दिली जाईल आणि 256 GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध असणार आहे.

हे वाचले का?  रतन टाटा यांच्या निधनामूळे वरसोली गावावर शोककळा; जाणून घ्या काय होते रतन टाटांचे अलिबाग मधील वरसोली कनेक्शन

कसा असणार कॅमेरा ?

Xiaomi 13 Pro मध्ये कंपनी तुम्हाला DSLR कमरेच्या लेव्हलचा कॅमेरा देणार आहे. भारतात येणाऱ्या फोनचा कॅमेरा Leica ब्रॅंडिंगसह येणार आहे. त्यामध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचे तीन कॅमेरे असतील. तसेच वापरकर्त्यांना यामध्ये OIS फिचर देखील मिळेल ज्यामुळे तुम्ही यामधून स्मूथ व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकणार तसेच या फोनला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा येणार आहे.

हे वाचले का?  AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी

Xiaomi 13 Pro या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ४८२० mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. यामध्ये १२० वॅटचे चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. तसेच ५० वॅटचे फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील यात वापरकर्त्यांना मिळणार आहे. हा स्मार्टफोन ५जी नेटवर्कला सपोर्ट करतो.