अंतराळातील कचऱ्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

अंतराळात असंख्य उपग्रह सोडण्यात येत असल्याने अंतराळ कचऱ्यात वाढ होत आहे, असे त्या म्हणाल्या.

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी अंतराळातील कचऱ्याबाबत चिंता व्यक्त केली. अंतराळात असंख्य उपग्रह सोडण्यात येत असल्याने अंतराळ कचऱ्यात वाढ होत आहे, असे त्या म्हणाल्या. २०३० पर्यंत भविष्यातील अंतराळ मोहिमा कचरामुक्त करण्याचे लक्ष्य ठेवल्याबद्दल राष्ट्रपतींनी इस्राोचे कौतुकही केले.

हे वाचले का?  Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, विशेष न्यायालयाचे आदेश; कारण काय?

भारताच्या चंद्रयान-३ प्रकल्पाच्या अवतरणाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या समारंभात मुर्मू बोलत होत्या. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्राो) अध्यक्ष एस सोमनाथ आणि अभियंते, शास्त्रज्ञ उपस्थित होते.