अग्निपथ योजनेविरोधातील ठराव पंजाब विधानसभेत संमत; राज्य सरकारचा योजनेला जोरदार विरोध

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात पंजाब विधानसभेत गुरुवारी ठराव मंजूर करण्यात आला.

पीटीआय, चंडिगढ : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात पंजाब विधानसभेत गुरुवारी ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा ठराव मांडला होता. भाजपचे आमदार अश्वनी शर्मा आणि जंगीलाल महाजन यांनी या ठरावाला जोरदार विरोध केला.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “…तर भारताने ऑलिम्पिकवर बहिष्कार घालावा”, विरोधकांची मागणी; पंतप्रधान काय म्हणाले?

या ठरावावर चर्चा करताना मान म्हणाले, अग्निपथाच्या विरोधाचा मुद्दा पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटून त्यांच्यासमोर मांडणार आहे. ही योजना देशातील तरुणांच्या विरोधातील असून योजनेला देशभरात कडाकडून विरोध होत आहे, असे मान यांनी सांगितले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे प्रतापसिंग बाजवा यांनीही ही योजना मागे घेण्याची मागणी केली, तर अकाली दलाचे आमदार मनप्रीत सिंग अयाली यांनी ठरावाला पाठिंबा देत योजना गुंडाळण्याची मागणी केली.

हे वाचले का?  रतन टाटांच्या कारकिर्दीत समूहाचा महसूल १८,००० कोटी रुपयांवरून ५.५ लाख कोटींवर