अतिवृष्टीतील नुकसानीसाठी १४७ कोटींची मागणी

परतीच्या पावसामुळेही  नुकसानीचे सत्र कायम राहिले. ऑक्टोबरमधील पंचनाम्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

नाशिक : ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी  व ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात ६७४ गावांतील दोन लाख २४ हजार ९१९ शेतकऱ्यांना फटका बसला. जिरायती, बागायती, वार्षिक व बहुवार्षिक फळपिकांखालील एक लाख ७१ हजार ८६७.५३  हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.  त्यामुळे राज्य शासनाकडे  १४७ कोटी २१ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.

परतीच्या पावसामुळेही  नुकसानीचे सत्र कायम राहिले. ऑक्टोबरमधील पंचनाम्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्याआधी झालेल्या नुकसानीचा संयुक्त अंतिम अहवाल तयार करण्यात आला.  जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी सूरज मांढरे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत हा अहवाल विभागीय कृषी सहसंचालकांकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे अनुदानाची मागणी प्रशासनाने केली आहे.

हे वाचले का?  लाच स्वीकारताना वेतन भविष्य निर्वाह निधी पथकची महिला अधिकारी जाळ्यात

नैसर्गिक संकटाची जिरायत पिकांना झळ बसली. यात मका (६८२०७), बाजरी १७६२७), भुईमूग (२६५८), सोयाबीन (१३९६७), ज्वारी (४४१) , तूर (२४७), भात (२६०), कापूस (२७९९७) व इतर कडधान्य (३०९) हेक्टरवरील पिकांचे

३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. ६८०० रुपये प्रति हेक्टर अपेक्षित निधी धरून यासाठी ८९.५७ कोटींची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान मालेगाव (३०.०८), नांदगाव (३०.६६), येवला तालुक्यात (२६.१८), निफाड तालुक्यात (२.४३) कोटींचा समावेश आहे. या दोन महिन्यात कांद्याचे (३०९९५ हेक्टर), कांदा रोपे (०.८५ ), ऊस (२९.३०), भाजीपाला व इतर (१३२६.८२) असे एकूण ३२३५५.४२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यासाठी साडेतेरा हजार रुपये प्रतिहेक्टरने ४३.६७ कोटींची मागणी करण्यात आली आहे. फळ पिकाखालील क्षेत्रात पपई (१३५.८९), केळी (४१.७०), द्राक्ष (२८०.३०), पेरू (२३९), र्डांळब (सात हजार २९) अशा एकूण ७७९१.३९ हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले. वार्षिक पिकांसाठी हेक्टरी १३५० रुपये तर बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी १८ हजार यानुसार १३.९६ कोटींची मागणी करण्यात आली आहे.

हे वाचले का?  Priyanka Gandhi Vadra Net Worth : आठ लाखांची होंडा सीआरव्ही, सोनं-चांदी अन्…; प्रियांका गांधी वाड्रा यांची एकूण संपत्ती किती?

मालेगाव, येवला, नांदगावमध्ये अधिक नुकसान

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाचा मालेगावमधील १०९ गावांतील ७७ हजार ५४६, येवल्यातील १२४ गावांतील ७३ हजार ७५५ आणि नांदगाव तालुक्यातील १०० गावातील ६४ हजार ३९८ शेतकऱ्यांना फटका बसला. या शिवाय देवळा तालुक्यात चार गावे (८० शेतकरी), सुरगाणा ९१ (८८०), त्र्यंबकेश्वर ३१ (२७५), इगतपुरी २८ (३९४), पेठ १३५ (३९४), निफाड ५२ (६२८९) अशी बाधितांची संख्या आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live : लाडक्या बहीण योजनेत १५०० ऐवजी १० हजार द्या, संजय राऊतांची मागणी