अन्न औषध प्रशासनाकडून ५७ व्यावसायिकांविरुद्ध कारवाई

एक लाखापेक्षा अधिक दंड वसूल

एक लाखापेक्षा अधिक दंड वसूल

नाशिक : करोना संकटकाळात अनेकांनी खाद्यपदार्थाची विक्री करण्यास प्राधान्य दिले. परंतु असे करताना नियम धाब्यावर बसविल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने अशा नवख्या व्यावसायिकांवर नजर रोखली आहे. चार दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाई सत्रात ५७ व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. एक लाखापेक्षा अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रभान साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

करोनामुळे अनेकांच्या हातातील काम गेले आहे. त्यामुळे घरगुती अन्नपदार्थ तयार करणारे, चहा दुकान, नाश्ता, डबे, भाजीपाला, फळे आदींच्या विक्र ेत्यांमध्ये वाढ झाली आहे.  हा व्यवसाय करतांना अन्न सुरक्षा आणि मानके  कायद्यानुसार परवाना नोंदणी घेणे आवश्यक आहे. हे व्यावसायिक नवे असल्यामुळे त्यांना याबद्दल माहिती नाही. नोंदणी न करताच परवाना न घेता ते व्यवसाय करत आहेत. वास्तविक ही प्रक्रि या ऑनलाइन असून त्यासाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येते. व्यवसाय सुरू करण्याविषयी अन्न औषध प्रशासन विभागाकडून कु ठलीही आडकाठी नाही. के वळ व्यावसायिकांनी आवश्यक ती माहिती मिळवत आधारकार्डसह अन्य कागदपत्राची जोडणी करत नोंदणी करावी, असे आवाहन साळुंखे यांनी के ले आहे. नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दुसरीकडे उत्पादक, वितरक,घाऊक विक्र ेते यांनीही नवीन व्यवसायिकांकडे नोंदणी आहे की नाही, याची खातरजमा करून माल विक्री करावा. त्यासाठी प्रत्येक अन्न व्यवसायिक हा अन्न सुरक्षा मानके  कायद्यान्वये परवाना अथवा नोंदणी धारक असणे आवश्यक आहे. जर घाऊक विक्र ेता, वितरक यांनी विना नोंदणी अन्न पदार्थाची विक्री के ल्यास ते दंडास पात्र आहेत. परवाना, नोंदणी वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासनााने मोहीम आखली आहे. त्यानुसार रस्त्यामध्ये दूध, नाश्ता, फरसाण विकणाऱ्यांकडे तपासणी करण्यात येणार आहे.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

सात दिवसात शहर परिसरात अन्न आणि औषध प्रशासनाने विभागाने कारवाई के ली. यामध्ये चार हजार व्यावसायिकांना भेटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये रस्त्यावरचे खाद्यविक्र ेते यासह मिठाईसह किराणा माल विक्र ेते यांच्या मालाची तपासणी के ली. जिल्ह्य़ात आठ हजार २३० परवानाधाक असून २६,३४४ नोंदणीधारक आहेत. तसेच, सणासुदीचा काळ पाहता अन्न औषध प्रशासन विभागाने दिलेल्या नियमावलीचे पालन व्यावसायिकांनी करावे, असे आवाहन करण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासन विभागासमोर सध्या रिक्त पदांची अडचण आहे. सध्या विभागाकडे १० पदे आहेत.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

दोन अधिकारी पदे असून प्रत्यक्ष गाठी भेटी करता येत नाही. त्यांना के वळ कार्यालयीन काम आहे. दोन अधिकारी असून एक निलंबित, तर एक दीर्घ रजेवर आहे. बाकी सहा जणांवर ही जबाबदारी आहे. या अपुऱ्या मनुष्यबळावर नाशिक जिल्ह्य़ाचा कारभार रेटला जात आहे.

भगर खरेदी करताना काळजी घ्यावी

मागील काही वर्षांत भगर सेवनाने अन्न विषबाधा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रामुख्याने नवरात्र आणि उपवसाच्या दिवशी भगर वापरण्यात येते. भगर खरेदी करताना ती बंदिस्त असावी. त्यावरील तपशील तपासून घ्यावा, वापरण्याची अंतिम तारीख तपासून घ्यावी. शक्यतो भगरीचे पीठ न घेता भगर विकत घेऊन स्वच्छ करत घरगुती पद्धतीने त्याचे पीठ तयार करावे, अशी सूचना अन्न आणि औषध प्रशासन विभागाने के ली आहे.