आजपासून चार दिवस राज्यात उष्णतेची लाट ; विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पाऱ्याने चाळिशी ओलांडली; चंद्रपूर ४३.४

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध जिल्ह्यांना उष्ण लाटेचा पिवळा इशारा देण्यात आला आहे.

पुणे : दरवर्षी मार्च महिन्यात ऊन तापायला सुरुवात होते, तर कमाल तापमानाचा पारा एप्रिलमध्ये चाळिशी गाठतो. मात्र, यंदा मार्चच्या शेवटच्या आठवडय़ातच राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांवर गेला आहे.

यंदा २१ ते २४ मार्च आणि २८ ते ३१ मार्च या कालावधीत दोन उष्णतेच्या लाटा नोंदवल्या जातील, असा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. बुधवारपासून शनिवापर्यंत राज्यात पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय होत असून, सध्या कोकण वगळता राज्यातील बहुतांश भागात सरासरी कमाल तापमान ३८ ते ४० अंशांवर गेले आहे.https:/

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध जिल्ह्यांना उष्ण लाटेचा पिवळा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात ३० मार्च, १ आणि २ एप्रिल, नगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि अकोला या जिल्ह्यांत ३० व ३१ मार्च आणि १ व २ एप्रिल, अमरावती, बुलढाणा ३० आणि ३१ मार्च, चंद्रपूर ३१ मार्च, नागपूर ३० मार्च, यवतमाळ ३० आणि ३१ मार्च या कालावधीत या जिल्ह्यांत उष्णतेची लाट तीव्र जाणवणार आहे.

मार्च महिन्यातच राज्याचा पारा सरासरी ४१ अंशांवर गेल्याने यंदा मोसमी पाऊस वेळेवर येण्याची शक्यता आहे. कमाल तापमानाचा पारा विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी येथे ४४ ते ४६ अंश तसेच रायगडमधील भिरा येथेही विक्रमी तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिलमध्येही कमाल तापमान वाढणार आहे.

हे वाचले का?  भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”

– डॉ. रामचंद्र साबळेजेष्ठ हवामान शास्त्रज्ञ

कमाल आणि किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

पुणे : ४०-१९.६, नगर : ४१.७-२२.६, जळगाव : ४१.८-२४.३, कोल्हापूर: ३९.६-२२.६, नाशिक : ३८.१-२०.४, सांगली : ४०.३-२३.२, सातारा : ३९.४-२२.२, सोलापूर : ४२.१-२४,

मुंबई : ३३.१-२३.५, रत्नागिरी : ३३.४-२५.८, औरंगाबाद : ३९.६-२१.८, परभणी : ४१.६-२३.४, नांदेड : ४१.६-२१.८, अकोला : ४३.१-२३.५, अमरावती : ४१.६-२१.५, चंद्रपूर : ४३.४-२२.६

हे वाचले का?  Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान