आदिवासी भागातील टंचाईमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम

चारुशीला कुलकर्णी पाण्यासाठी भटकं तीत अधिक वेळ  : – नाशिक : उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असताना ग्रामीण भागात विशेषत:_ आदिवासी भागात टंचाई जाणवण्यास सुरुवात

चारुशीला कुलकर्णी

पाण्यासाठी भटकं तीत अधिक वेळ  : – नाशिक : उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असताना ग्रामीण भागात विशेषत:_ आदिवासी भागात टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे.  त्र्यंबके श्वार, हरसूल, पेठ, सुरगाणा भागातील काही गावांमध्ये मार्चच्या मध्यंतरातच पाण्यासाठी भटकं ती सुरू झाली असून महिलांना डोक्यावर हंडे घेऊन मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. पाण्याच्या या दुष्टचक्रात येथील मुलेही अडकल्याने अनेकांच्या शिक्षणावर गदा आली आहे.

यंदा पाऊस समाधानकारक राहिला. परंतु, आदिवासी भागात पाणी साठवणूक करण्याची व्यवस्था नसल्याने मार्चच्या मध्यंतरातच हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना मैलोनमेल भटकं ती करावी लागत आहे. बायका डोक्यावर चुंबळ ठेवत डोईवर दोनहून अधिक हंडे घेत, एका हातात हंडा किं वा बादली आणि दुसऱ्या हातात चिमुकल्याला धरत पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलयोजना मंजूर झाल्या असल्या तरी कागदावर असलेली केंद्र सरकारची हर घर नल योजना अद्याप त्र्यंबके श्वार परिसरात सुरू झालेली नाही. तालुक्यातील ४५ पैकी पाच ग्रामपंचायतींमध्ये पाणी प्रशद्ब्रा सुटला असताना ४० हून अधिक ग्रामपंचायती, समूह ग्रामपंचायतींमध्ये पाण्याचा प्रशद्ब्रा भीषण बनला असल्याची माहिती  अनिल बोरसे यांनी दिली.

हे वाचले का?  IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

भौैगोलिक परिस्थितीमुळे उंच-सखल परिसर असल्याने पाणी चढवायचे कसे, असा प्रशद्ब्रा प्रशासनाकडून उपस्थित होतो. रस्ते कच्चे तसेच खराब असल्याने गावात टँकर पोहचू शकत नाही. काही भागात महिलांचे श्रम कमी करण्यासाठी जलचक्री देण्यात आली असली तरी बहुतांश गावातील विहिरींनी तळ गाठला असल्याने जंगल परिसरातील जुन्या विहिरी, ओहोळ,  झरे येथून पाणी मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मैना लहारे यांनी दिली.  हरसूल येथील गावठा पाड्यावर विहिरीने तळ गाठल्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी रात्र रात्र जागून काढावी लागत आहे. शासनाकडून टँकर मंजूर झाला असला तरी या टँकरमधील पाणी थेट विहिरीत सोडले जाते. पाड्यावरील लोक कु टुंबातील सदस्यांसह विहिरीतून पाण्याचा उपसा करतात. सध्या लग्न सराई सुरू असल्याने पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे. हा उपसा करताना होणारी घाई नागरिकांच्या जिवावर बेतत असून महिलांना आरोग्यविषयक तक्रारी सुरू झाल्या आहेत. या पाण्याच्या लगीनघाईत मुलेही ओढली गेल्याने करोना संसर्गाने बंद असलेली शाळा आणि शिक्षण यावर फु ली मारण्यात आली आहे. पाण्यासाठी होणारी पायपीट नित्याची आहे. याविषयी लोकप्रतिनिधी के वळ निवडणुकीच्या काळात आवाज उठवतात. पाड्यावर येत नमस्कार के ले जातात. निवडणुकीनंतर या वाड्यांकडे फारसे कोणी फिरकत नाही. या प्रशद्ब्राला कं टाळून अनेकांनी शहराचा रस्ता धरला असला तरी सध्या करोना संसर्गामुळे रोजीरोटीवर गदा आली आहे.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!