‘आयएमए’च्या आंदोलनास देशभरातून प्रतिसाद

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील डॉक्टरांनी काळ्या फिती लावून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.

देशातील आयुर्वेद शाखेच्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास मुभा दिल्याच्या निषेधार्थ भारतीय वैद्यक परिषदेने (आयएमए) शुक्रवारी संपाची हाक दिली होती. त्यानुसार अत्यावश्यक आणि करोना उपचार वगळता अन्य वैद्यकीय सेवा सकाळी ६ ते सायंकाळी ६ या दरम्यान बंद ठेवण्यात आल्या. यात गुजरातमधील ३० हजार डॉक्टर सहभागी झाले.

हे वाचले का?  अन्यथा ‘लाडकी बहीण’ रद्द करू! सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील डॉक्टरांनी काळ्या फिती लावून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.

आयुर्वेद शाखेच्या पदव्युत्तर तज्ज्ञांना शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याविरोधात आयएमएच्या सदस्यांनी देशभरात आंदोलन केले. आयुर्वेद डॉक्टर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सक्षम आहेत काय, असा सवाल आयएमएने केला आहे. सरकारचा हा निर्णय मिश्र उपचारांना (मिक्सोपॅथी) मुभा देणारा आहे, असा संघटनेचा आक्षेप आहे. आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेश शर्मा म्हणाले की, ‘‘आयुर्वेदाच्या परंपरेचा आम्हाला अभिमान असला तरी आधुनिक उपचार हे नियमनात्मक आणि संशोधनात्मक आहेत. त्यामुळे या दोन्हींची सरमिसळ करता कामा नये.’’

हे वाचले का?  Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक